e 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा पश्‍चिममध्ये आणखी नऊ कोरोनाबाधीत

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली) ः शिराळा तालुक्‍यात गेल्या 24 तासात नऊ जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मणदूर 5, माळेवाडी 1, खेड 1 पणुंब्रे तर्फ शिराळा 1, पुनवत 1 अशी गावनिहाय रुग्णसंख्या आहे. आजच्या रुग्णसंख्येमुळे शिराळा पश्‍चिम भागातील रुग्णसंख्येच अर्धशतक पूर्ण झाले आहे. एकट्या मणदूर गावातील रुग्णांची संख्या 36 इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत शिराळा तालुक्‍यातील रुग्णाची संख्या 68 तर पश्‍चिम भागातील रुग्णांची संख्या 53 झाली आहे. माळेवाडी येथील 60 वर्षीय वृद्ध 2 जून रोजी आपल्या कुटुंबा समवेत मुंबईहून आले होते. घरीच क्वारंटाईन झाले होते. 50 वर्षापुढील लोकांचे स्वॅब घेणे जात असल्याने त्या वृद्धाचाही स्वॅब घेतला होता. त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही पण त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील चार लोकांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मणदूर येथील रुग्ण कोरोना बधितांच्या संपर्कातील असून खेड येथील 44 वर्षीय युवक आपल्या कुटुंबातील तीन जणांच्यासह 6 जून रोजी मुंबईहून आलेले आहेत. ते घरीच क्वारंटाईन होते. त्यास 11जूनला त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे नेले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील तिघांना शिराळा येथे क्वारंटाईन केले आहे. पणुंब्रे तर्फ शिराळा येथील 35 वर्षीय युवक हा मुंबईहून सासुरवाडीत 4 जूनला आला . तो मूळचा कराड तालुक्‍यातील दुशिरे गावचा आहे. मुंवईहून आल्याने त्याचा 10 तारखेला त्याचा स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यास कोणताही त्रास जाणवत नाही. तो पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील सहा जणांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पुनवत येथे मुंबईहून लेकीकडे आलेल्या 85 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. ती मूळची कणदूर येथील आहे. चार दिवसांपूर्वी तिला त्रास जाणवू लागल्याने तिच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. तालुक्‍यात निगडी 4 , रेड 3 , अंत्री खुर्द 1 , मोहरे 2 , खिरवडे 2, करुंगली 1 , चिंचोली 1 , मणदूर 36 काळोखेवाडी 2, रिळे 6,माळेवाडी2,मांगले 3 ,किनरेवाडी 1, लादेवाडी 1,खेड 1,पणुंब्रे तर्फ शिराळा 1,पुनवत 1 असे एकूण 68 रुग्ण झाले आहेत.
निगडी 3,रेड3,चिंचोली 1,करुंगली 1, मोहरे 1,मणदूर 4, खिरवडे 2,रिळे 1 असे 16 कोरोना मुक्त झाले आहेत.

शिराळ्यातील एकूण रुग्ण - 68
कोरोना मुक्त- 16
कोरोनामुळे मृत- 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rated Today: आठवड्याच्या शेवटी सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31 हजारांनी घसरलं; ताजा भाव पाहा

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

SCROLL FOR NEXT