सिंधू पाटील sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : प्रतिकूल परिस्थितीत दोन्ही मुलांना पाठविले देशसेवेत

पतीचे अकाली निधन, त्यात तीन मुलांचा सांभाळ, शिक्षणाची जबाबदारी घेतली

विकास पाटील

निपाणी: पतीचे अकाली निधन, त्यात तीन मुलांचा सांभाळ, शिक्षणाची जबाबदारी यामुळे नांगनूर येथील सिंधू पाटील या खचल्या. पण जिद्दीने त्यांनी तीन्ही मुलांना शिक्षण दिले. त्याचा परिपाक म्हणून दोन्ही मुले देशसेवेत असून मुलीने बी. काॅम. पूर्ण केले आहे. अखंड २० वर्षे संघर्ष केल्याने त्याचे गोड फळ मिळाले आहे.

नांगनूर येथील सामान्य कुटूंबातील विश्वनाथ पाटील-दवळकर हे भांडी कारखान्यात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. त्यांचे 2002 मध्ये अचानक निधन झाले. त्यामुळे त्यांची मुले सुशांत, शुभम व मुलगी सुप्रिया ही अनुक्रमे 2, 4 व 6 वर्षाची होती. त्यावेळेपासून पत्नी सिंधू पाटील यांच्यावर तीन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पडली. केवळ 10 गुंठे जमीन असल्याने चौघांचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण अशक्य होते. पतीच्या निधनानंतर 2003 पासून नांगनूर येथील मराठी शाळेत माध्यान्ह आहार विभागात स्वयंपाक बनविण्यासाठी त्या कामाला जावू लागल्या. शाळेतील मुलांच्या स्वयंपाकाचे काम करत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. परिस्थिती हालाखीची असल्याने सिंधू यांचा कुर्ली येथील भाऊ सागर कमते यांनीही त्यांना मदतीचा हात दिला. स्वतःचे तुजपुंजे वेतन व भावाच्या मदतीने मुलांना शिक्षण दिले. निराधार मुलांनाही शिक्षण घेताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अखंड 20 वर्षाच्या संर्घषानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये सुशांत हा स्पर्धा परीक्षा देऊन नौदलात प्रशिक्षणासाठी रुजू झाला. त्यापाठोपाठ शुभम 2021 सीआयएसएफ विभागात सैन्यदलात दाखल झाला. सुप्रिया हिनेही सध्या बी. काॅम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन मुले देशसेवेत दाखल झाल्याने आई सिंधु यांचे आनंदाश्रू अनावर झाले होते. वर्गमित्रांनाही त्यांचे कौतूक केले जात आहे. अखंड 20 वर्षाचा संर्घषाचा वनवास संपल्यानंतर आई सिंधू पाटील यांच्या चेहरयावर आजही आयुष्यात खाल्लेल्या खस्तांच्या खुणा नकळत दिसत आहेत.

इतर मातांनी घ्यावा आदर्श

घरची परिस्थिती बेताची असताना मुले लहान होती. त्यावेळेलाच पतीचे निधन झाले. त्याचा धक्का पत्नी सिंधू यांना बसला होता. मात्र खचलेल्या मनाला उभारी देत त्यांनी आपल्या भावाच्या मदतीने दोन्ही मुलांना देशसेवेत दाखल केल्यामुळे शाळा, आई व गावचे नावलौकीक झाला आहे. इतर मातांनीही त्यांचा आदर्श घेऊन मुलांवर चांगले संस्कार करावेत.

घरची परिस्थिती बेताची असतानाच पतीचे निधन झाले. त्या वेळेपासून तीन मुले सांभाळण्याची जबाबदारी पडली. खचलेल्या मनाला उभारी देत तीन मुलांचा सांभाळ करून त्यांना देशसेवेत पाठविले आहे. त्यामुळे मनाला समाधान वाटत आहे.

-सिंधू पाटील,आई, नांगनूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT