कडबा भिजला sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : वळिवाने झाला लाभ,तितकेच नुकसानही

उन्हाळी पिके जोमात शेतकऱयांचा कडबा भिजला

अशोक परीट

निपाणी: वळीव पावसाने शहर परिसराला चांगलेच झोडपले. या आठवड्यातील हा झालेला दुसरा जोरदार पाऊस. तो पेरणीपूर्व मशागतीला जेवढा पोषक आहे, तेवढाच शेतातील काढणीस आलेल्या पिकांना मारक आहे. नुकसान आणि फायदा या दोन्ही पातळीवर शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. परिसरातील रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी जवळपास पूर्ण झालेली आहे. गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु ज्वारीचा कडबा वैरण शेतातच आहे. तूर, उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे. त्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. तंबाखू खरेदी-विक्रीच्या हंगामाला ही थोडा चाप बसला आहे. मात्र हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. शिवाय सर्व उन्हाळी पिकांना ही लाभदायक ठरला आहे. लाभ आणि नुकसान अशा संमिश्र कात्रीत शेतकरी सापडला आहे.

उन्हाळी पिकांना लाभदायक

उसाचा खोडवा लावण भुईमूग सोयाबीन या उन्हाळी पिकांना हा पाऊस लाभदायक आहे. या पिकांना किमान पंधरा दिवस पाण्याची पाळी दिली नाही तरी चालेल, असे शेतकरी सांगतात.

कलिंगड काकडीला मार

परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी या वर्षीही कलिंगड व काकडी पीक घेतले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने या उत्पादनाला मागणी आहे. मात्र पावसाने या पिकाला मार बसणार असल्याची चर्चाही शेतकरी करत आहेत.

गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या दरम्यान दरवर्षी पडणाऱ्या वळिवाने यंदा लवकर प्रारंभ केला. तो पेरणीपूर्व मशागतीसह उन्हाळी पिकांना लाभदायी आहे. परंतु सध्या काढणीला आलेल्या सर्वच पिकांना मारकही आहे. शेतकऱयांची कडबा वैरण भिजली.

-संतोष खराडे,शेतकरी, शिरगुप्पी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT