Nipani  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Nipani : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कडक बंदोबस्त

सीमाप्रश्न सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिसप्रमुखांची निपाणीत बैठक

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी बेळगावात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात बंदोबस्त वाढविला आहे. या काळात नागरिकांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले. गुरुवारी (ता. १) दुपारी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

डॉ. संजीव पाटील म्हणाले, ‘‘सीमाप्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील सर्वच घडामोडीवर पोलिस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सीमाभागातील गावासह शहराच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सर्वतोपरी बंदोबस्त केले आहे.’’

यावेळी त्यांनी मुरगूड रोडवरील आंतरराज्य सीमेवर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अथणी, कागवाड, कोगनोळी, बोरगावसह इतर आंतरराज्य मार्गांवर तपासणी नाके उभारले आहेत. एसआरपी सीआरपी पथकासह 500 पोलिस कार्यरत केले आहेत. शनिवारी किंवा मंगळवारी महाराष्ट्रातील मंत्री बेळगावात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

अशावेळी त्यांना प्रवेश द्यायचा की नाही? याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्याबाबत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कर्नाटक, महाराष्ट्र सीमाभागात भाषिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी पोलिस कटीबद्ध आहेत. निपाणीसह जिल्ह्यातील आंतरराज्य सीमेवरील परिस्थितीची निरंतर माहिती घेतली जात आहे. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांनी आपापले व्यवसाय सुरू ठेवावेत.

यावेळी चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक बसवराज एलीगार, चिक्कोडीचे पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, सदलगा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक भरतगौडा, शेखर असोदे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT