file photo sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : पोलिसांची राहणार मद्यपींवर नजर!

रंगपंचमीला चौका-चौकात बंदोबस्त

- राजेंद्र हजारे

निपाणी: यंदा होळी, धुलीवंदनानंतर मंगळवारी (ता. २२) रंगपंचमी साजरी होणार आहे. त्यामुळे निपाणी शहरासह ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाने रंगपंचमीला मद्यपी नागरिक आणि वाहनचालकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. चौका-चौकात बॅरिकेट्स लावून व ब्रीथ अॅनालायझरद्वारे तपासणी करून हुल्लडबाजांवर कारवाई केली जाणार आहे.

निपाणी तालुक्यात मंगळवारी (ता. २२) रंगपंचमी सण साजरा होणार आहे. या उत्सवासाठी बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिस दलापुढे आहे. या दिवशी शहर, ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ केली जाणार आहे. मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला जाणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांतर्फे विशेष मोहीम व नाकाबंदी होणार असून रंगपंचमी साजरी करताना नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

तर होईल वाहन चालकांवर कारवाई

पोलिसांनी चौका-चौकात हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. ज्यामध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱय़ा व्यक्ती, ट्रिपल सिट बसवून वाहन चालविणारे, मोबाईल फोनवर बोलत वाहन चालविणारे, अती वेगाने संशयितरित्या वाहन चालविणे, महिला, युवतींची छेडछाड करून पळणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मद्यपी आढळल्यास, मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांची ब्रीथ अॅनालायझरव्दारे तपासणी केली जाणार आहे. त्यांना सरकारी रुग्णालयात नेवून तपासणी करून कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. महिलेची छेडछाड करून महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे

संगमेश शिवयोगी

'रंगपंचमी सण केवळ तीन दिवसांवर आला असून या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या काळात मद्यप्राशन करून वाहन चालविणे व रंगपंचमी साजरी करण्यास मनाई आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

-संगमेश शिवयोगी,मंडळ पोलिस निरीक्षक, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT