मुरगूडमध्ये कडकडीत बंद : पोलीसांच्या दडपशाही विरोधात सर्वपक्षीय निषेध फेरी sakal
पश्चिम महाराष्ट्र

मुरगूडात पोलीसांच्या दडपशाही विरोधात कडकडीत बंद

सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीतर्फे शहरातून निषेध फेरी

प्रकाश तिराळे

मुरगूड : निपाणी - मुदाळतिट्टा रस्त्यासाठी मुरगूडमध्ये बुधवारी झालेल्या रास्तारोको आंदोलनातील आंदोलकांवर पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल, पोलीसांच्या दडपशाही विरोधात आणि आंदोलकांची तक्रार दाखल करुन घेत नसल्याच्या निषेधार्त आज सकाळी सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीतर्फे शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या मुदाळ तिट्टा - निपाणी रस्त्यासाठी बुधवारी ( ता. २०) मुरगूड येथे सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन केले होते.या आंदोलना दरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राधानगरीचे सहायक अभियंता अमित किरण पाटील यांनी आपल्याला पांडुरंग भाट,रवि परीट,दत्ता मंडलीक,व बजरंग पाटील (सर्व रा.मुरगूड ) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.व आपला शर्ट फाडला अशी तक्रार मुरगूड पोलीसांत दिली आहे.यामध्ये सतिश कृष्णकांत किल्लेदार हे जखमी झाल्याचीही फिर्याद दिली आहे. पोलीसांनी या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पण मुरगूड पोलीसांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचे व आंदोलनकर्त्यावर मुरगूड पोलीसांनी दाखल केलेले गुन्हे हे खोटे आहेत. शिवाय आंदोलकांनी दिलेल्या तक्रारीची पोलीस दखल घेत नाहीत. असे सर्वपक्षीय रस्ता बचाव कृती समितीचे म्हणणे आहे. परिणामी मुरगूड पोलीसांच्या दडपशाहीच्या विरोधात व आंदोलकांनी दिलेल्या तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळी ९ वाजता शहरातून सर्वपक्षीय भव्य अशी निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी शहरातील सर्व व्यापारी,दुकानदार यांनी व्यवहार कडकडीत बंद ठेवून पाठींबा दर्शविला. सणासुदीचे दिवस असल्याने दुपारनंत व्यवहार सुरु राहिले.

दरम्यान निषेध फेरी बसस्थानकावरुन सुरु झाली.ती नाका नं.१ ला गेली तेथून पोलीस ठाण्यावर जावून मुरगूड पोलीसांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत,रस्त्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने इस्पुर्लीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना देण्यात आले. आंदोलकांच्या मागण्यांचा निप:क्षपातीपणे तपास करुन योग्य ती कार्यवाही करु.असे आश्वासन विश्वास पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT