विद्यार्थ्यांनी बनविल्या दिवाळीच्या वस्तू sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : विद्यार्थ्यांनी बनविल्या दिवाळीच्या वस्तू

निपाणीतील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम : १५० विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री झाली. शाळेच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालकांनी कौतुक केले. शिवाय पालकांसह ग्राहकांनी या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे.

दिवाळी निमित्त सजावटीसाठी आकाश कंदील, पणत्या व इतर साहित्य बाजारातून खरेदी केले जाते. पण विद्यार्थ्यांना विविध कलांची माहिती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमात १ ली ते १० वी च्या १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वतः विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध प्रकारच्या पणत्या, आकाशदिवे, रांगोळी, मातीची खेळणी अशा अनेक वस्तुंचे प्रदर्शन पाहण्यासाठी व खरेदीसाठी असंख्य पालकांनी उपस्थिती दाखवून विदयार्थ्यांकडून वस्तूंची खरेदी करून प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान होणे तसेच आपल्या परिसरातील किंवा परंपरेने चालत आलेल्या व्यवसायाची जाणीव व आवड निर्माण होवून विविध कौशल्याने परिपूर्ण असा विद्यार्थी निर्माण करणे, हा उद्देश ठेवून या कार्यक्रमाची आयोजन केल्याचे प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT