वाढत्या मागणीमुळे कलिंगडाच्या भावातही वाढ झाली आहे.  sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणी : माळरानावर घेतले कलिंगडचे यशस्वी पीक!

भीमापूरवाडीच्या सुधाकर शेटकेंचा प्रयोग : एकरी लाखाचे उत्पन्न

- राजेंद्र हजारे

निपाणी: निपाणी आणि परिसरात गतवर्षी ऐन खरिपातील पिके काढणीवेळी अतिवृष्टी झाली होती. परिणामी पिकांचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धताही झाली. त्यामुळे अतिवृष्टीसारख्या संकटाशी सामना करत शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह फळ भाजीपाला व इतर विविध पिके केली. त्यातून निश्चितच अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला. भीमापूरवाडी येथील युवा शेतकरी सुधाकर शेटके यांनी एक एकरात कलिंगडची लागवड केली. त्यातून केवळ ६५ दिवसात लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

कमी कालावधीत जादा उत्पन्न देणारे पीक घेण्याकडे वेदगंगा-दूधगंगा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. यात प्रामुख्याने कलिंगड, पपई, टोमॅटो, भेंडी, मिरची आदी पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी अतिवृष्टीत फळ, भाजीपाला शेतीचे नुकसान झाले होते. मात्र यंदा पुन्हा हिंम्मत दाखवत निपाणी भागातील शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळशेती केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भीमापूरवाडी येथील सुधाकर शेटके हा तरुण शेतकरी फुल, भाजीपाला शेती करीत आहे. त्याने माळरानावर एक एकर जमिनीत जानेवारी २०२२ मध्ये कलिंगडची लागवड केली. मल्चिंग पेपरचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खताची योग्य मात्रा दिली. लागवड केल्यानंतर ६५ दिवसात फळ विक्री सुरु होऊन व्यापारी त्याच्या थेट बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करत आहेत. प्रतिटन आठ हजार रुपये भाव त्याला मिळला. एक एकरात १५ टन कलिंगड निघाले असून अवघ्या ६५ दिवसात एक लाख रुपयांचे उत्पन्न यातून झाले आहे.

सुधाकर शेटके

'कोरोनाचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसा झाल्यामुळे यावर्षी बाजारपेठा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक खुल्या झाल्या आहेत. आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कलिंगडाला मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे कलिंगडाच्या भावातही वाढ झाली आहे. याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना मिळत आहे.'

-सुधाकर शेटके,कलिंगड उत्पादक शेतकरी, भीमापूरवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT