पश्चिम महाराष्ट्र

सांगली मनपा आयुक्तपदी नितीन कापडणीस

सकाळ वृत्तसेवा

सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता. १९) महापालिकेची सूत्रे स्वीकारणार आहेत.

गेले काही महिने आयुक्त खेबुडकर आणि भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात बिनसले होते. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये निधी देऊनही कामे सुरू नाहीत. कामांच्या फायली अडवून ठेवतात. यामुळे नगरसेवक व पदाधिकारी नाराज होते. त्यातच विद्यमान आयुक्त खेबुडकर यांना सांगलीत तीन वर्षे पूर्ण झाली होती. तरीही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची चर्चा सुरू झाल्यावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच मुंबईत भेटून त्यांच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला.

महापौर संगीता खोत, भाजपचे नेते शेखर इनामदार आणि पदाधिकाऱ्यांनी काल (ता. १७) मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीतच त्यांनी आयुक्त खेबुडकर यांची तातडीने बदली करण्याची मागणीही केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बदली करण्याचे आश्‍वासन दिल्यावर २४ तासांतच आयुक्त खेबुडकर यांना बदलीचे आदेश निघाले.

महसूल व वन विभागाकडे मंत्रालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. नूतन आयुक्त कापडणीस सध्या नागपूर महापालिकेचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी सांगली महापालिकेत मिरजेचे उपायुक्त म्हणून यापूर्वी काम केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: शुभमन गिलमुळे रन आऊट झाला? द्विशतक हुकलेल्या यशस्वी जैस्वालने अखेर सोडले मौन, म्हणाला...

Stock Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे शेअर बाजार हादरणार; सोमवारी बाजारात काय होणार?

CM Yogi Adityanath : सीएम योगींच्या 'स्वदेशी अभियाना'ला नवी भरारी; 'स्वदेशी मेळ्यां'मुळे कारागिरांची दिवाळी होणार समृद्ध!

Sabja Seeds Health Benefits: सब्जा बियांचे पाच फायदे! हार्वर्डच्या डॉक्टरांचा दावा, हृदय हेल्दी अन् वजन घटणार

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे 'बीओटी' तत्त्वावर काम लवकरच सुरू होणार; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT