No entry for tourists in Raleganshidhi 
पश्चिम महाराष्ट्र

पर्यटकांना राळेगणसिद्धीत "नो एन्ट्री'...अण्णांचा आदेश  

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी : कोरोनाची सगळ्या जगानेच धास्ती घेतली आहे. या विषाणूची लागण झाल्यानंतर रूग्णांचे दगावण्याचे प्रमाण किती आहे? याचा कोणताही विचार न करता प्रत्येकाने कोरोनाची भीती मनात घालून घेतली आहे. त्यामुळे अनेकांना भीतीचाच संसर्ग झाला आहे. आयपीएलच्या तारखाही पुढे ढकलण्याची तयारी सुरू आहे. आदर्श गाव राळेगणसिद्धीने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.खुद्द ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. 

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे गाव परिसर राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे, अशी प्रेमाची विनंती अण्णांनी आज प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. सध्या जगभर कोरोना पाय पसरत आहे. भारतातही करोना व्हायरसने प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना न घाबरता या रोगाला धैर्याने तोंड देण्यासाठी डॉक्‍टरांनी जे जे पथ्य सांभाळण्यासाठी सांगितले आहेत, ते नागरिकांनी सांभाळावे. त्यामुळे त्याचा प्रादूर्भाव होणार नाही. 

आजपर्यंत राळेगणसिद्धी येथे 16 लाखांपेक्षा जास्त पर्यटक देश-विदेशातून आले आहेत. या पर्यटकांची विशेषतः अण्णासोबत सेल्फी काढून घेण्याची अपेक्षा असते. त्यामुळेच अण्णा हजारे यांच्या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे पर्यटकांना व कार्यकर्त्यांना राळेगणसिद्धी न येण्याचे आवाहन केले आहे. 

परिवाराचा निर्णय 
राळेगणसिद्धी येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातून व महाराष्ट्र राज्यातून त्याचप्रमाणे विदेशातून पर्यटक येत असतात. महाराष्ट्र राज्यात ह्या आजाराने शिरकाव केला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आम्ही राळेगणसिद्धी परिवाराने निर्णय घेतला आहे. कोरोना आटोक्‍यात येत नाही, तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये. 
- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 

सरकार सांगत नाही तोपर्यंत 
शासनाकडून जोपर्यंत करोना हा संसर्गजन्य आजार आटोक्‍यात आला आहे, असे निर्देश येत नाही, तोपर्यंत पर्यटक व कार्यकर्त्यांनी शक्‍यतो राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे. 
- लाभेश औटी, माजी उपसरपंच, राळेगणसिद्धी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT