No labor should be outside sugar factory 
पश्चिम महाराष्ट्र

एकही कामगार कारखाना हद्दीबाहेर नको 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : महाराष्ट्र शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत एकही कामगार कारखाना हद्दीबाहेर जाणार नाही, याची जबाबदारी त्या त्या कारखान्यावर राहील, अशा सूचना पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांला दिल्या.

पोलीस उपाधीक्षक कार्यालयात श्री. शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, "हुतात्मा'चे अजित देशमुख, "विश्वास' चे राम पाटील, "कृष्णा'चे सूर्यकांत दळवी, "दालमिया' चे एस. रंगाप्रसाद, पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे उपस्थित होते. 

वाळवा व शिराळा तालुक्‍यात पाच साखर कारखाने आहेत. त्यातील सुमारे 7 हजार ऊसतोड कामगार आहेत. हे कामगार इतर जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी वाळवा व शिराळा तालुक्‍यात आले आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. या सर्व कामगारांची व कुटुंबाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे त्या त्या संबंधित कारखान्यांची जबाबदारी आहे. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत एकही कामगार कारखाना हद्दीबाहेर जाणार नाही अशा सूचना श्री. शर्मा यांनी बैठकीत दिल्या आहेत

बफर झोनला भेट! 
इस्लामपूर शहरातील कोरोना बाधित रुग्ण ज्या भागात राहातात त्या गांधी चौक व भाजी मंडई परिसरात पोलीस अधीक्षक श्री. शर्मा यांनी भेट दिली. पोलिसांना संचारबंदीबाबत कडक कारवाईचे आदेश दिले. त्या ठिकाणच्या नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधाबाबतही त्यांनी माहिती घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

विजय हजारे ट्रॉफीत 'प्लेअर ऑफ दी मॅच'ला १०,००० चं बक्षीस; मग विराट कोहली, रोहित शर्मा यांची मॅच फी किती होती? आकडा ऐकाल तर...

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी,इस्लाम पार्टी,समाजवादीची युती

New Year Party Dress: न्यू इयर पार्टीत सर्वांपेक्षा वेगळं दिसायचंय? ट्राय करा हे स्टायलिश बॉडीकॉन ड्रेस!

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT