No money for food; how to spare money for mobile 
पश्चिम महाराष्ट्र

पोटाची चिंता सतवतिया, मोबाईल कसा देऊ 

दिलीप क्षीरसागर

कामेरी (जि. सांगली) ः बाळा तुला कुठला देऊ मी मोबाईल, पोट भरायंची इथं पंचायत झालीया. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षणाचा ट्रेंड सुरू होऊ पाहत आहे. पण ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या आई वडिलांची पंचायत झाली आहे. "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे ही स्थिती झाली आहे.

शाळांना सुट्टी मिळाली. परीक्षा रद्द झाल्या. मात्र मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहावे या हेतूने विद्यार्थ्यांना घरातूनच ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यास घेण्याचा उपक्रम शाळांनी सुरू केला आहे. सुटीचा कालावधी शिक्षकांनी होमवर्क करावे, असेही शासनाने सांगितले. शासनाचा हेतू चांगला आहे. मात्र ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा फटका बसत आहे.

ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. काही ठिकाणी इंटरनेटची रेंज मिळत नाही. मोलमजुरी करणाऱ्या लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल कुठला. अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांची मुले शिक्षणाचे धडे तरी कसे घेणार ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शिक्षकांनी ऑनलाइन उपक्रम सुरु केला. शाळांतील विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचे ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबविण्यात येत आहे.

मात्र ज्यांच्याकडे मोबाईलच नाही अशांची अवस्था वाईट झाली आहे. ही अद्यावत शिक्षण प्रणाली ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का हेही पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या फायद्यापासून अनेक मुलं वंचितच राहिली. ज्या मुलांच्या घरातील पालक रोज मोलमजुरी करतात. त्यांना कुठला आलाय अँड्रॉइड मोबाईल. मात्र काही मुले पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल मागू लागली आहेत.

शेजारच्या मुलांकडे मोबाईल आहे, तर आपल्याकडे का नाही ? हा न्युनगंड ही मुलांत निर्माण होऊ शकतो. जर मिळालाचं मुलांना मोबाईल तर मग या मोबाईलचं व्यसनही लागू शकते. मग ते लवकर सुटेल की नाही सांगता येत नाही. घरातच खायला नाही पोटभर भाकर, मग कुठून देणार आपल्या पाल्यासाठी मोबाईल. मात्र ही प्रणाली इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मात्र प्रभावीपणे लाभदायी ठरल आहे. 

शैक्षणिक चॅनल सुरू करून अभ्यासक्रम राबवता येईल का पहावे

ऑनलाइन अभ्यासक्रम हा शासनाचा उपक्रम स्तुत्य आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर पालक जागरूक असणे महत्वाचे आहे. मोबाईल दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. नेटवर्किंगमुळे मुले अभ्यासक्रमात सक्रिय आहेत का, कुठे भरकटत तर गेली नाहीत ना हे पाहणे गरजेचे आहे. टेलीव्हीजनच्या माध्यमातून शैक्षणिक चॅनल सुरू करून अभ्यासक्रम राबवता येईल का हेही शासनाने पहावे.

- डॉ. राहुल मोरे, मानसोपचार तज्ञ, इस्लामपूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT