No pension no money no plans how to run a family now kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना साकड... ना पेन्शन, ना पैसा, ना योजना कसे चालवायचे आता कुटुंब...

विजय लोहार

नेर्ले (सांगली) :खेड्यापाड्यांमध्ये वाडी वस्तीवर लोकांची जीवनदायीनी असलेल्या, अडीअडचणीला वाहतुकीसाठी उपगयोगी पडनाऱ्या वडाप चालकांच्यासह त्यांच्या कुटुंबावर  कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर उपासमारीची वेळ आली आहे. गेली 15 ते 20 दिवस आपली वाहने घरीच लावून वाहनांच्या कडे बघत आपल्या कुटुंबाची व्यथा पहात वडापचालक वेळ घालवत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वडपचालक यांचेतुन होत आहे.

 एस टी बरोबेर महामार्ग,खेडो पाड्यात,वाडी वस्तीवर सातत्याने लोकांची ये-जा करण्यासाठी वडाप चालकांचा लोकांच्या प्रवासामध्ये सिंहाचा वाटा आहे.परंतु कोरोना च्या प्रसारामुळे आपली वाहने घरीच लावून पैसे मिळवण्याचे साधनच बंद पडल्याने  वडाप चालकांच्या वर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. प्रत्येक जिल्हयात हजारो वडाप वाहतूक करणारे वडाप चालक,रिक्षा चालक,व ट्रक चालक आहेत.कर्जाचे हप्ते त्यावरील व्याज आकारणी, घरची परिस्थिती यावर मात करताना त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. यांच्यासाठी  एखादी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी अशी मागणी वडाप चालक संघटनेच्या माध्यमातून होत आहे.

वाहने दारासमोरच

ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये वाड्यांना वस्तीवर तात्काळ मदतीची गरज भासल्यास पहिल्यांदा लोकांना वडाप चालकांची आठवण होते. रात्री-अपरात्री आजारी अथवा महिलांना घेऊन दवाखान्यात नेले जाते. अगोदर च रस्त्यावर अनेक वाहने  धावत असल्यामुळे व्यवसायात आलेली मंदी या मंदीतून आपले संसाराचा गाडा चालवत असताना अनेक प्रसंगाना चालकांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र होते. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे गेले एक महिना आपली वाहने दारासमोर लावून घरी बसले आहेत.

आम्ही आमचे कुटुंब कसे चालवायचे ​:वडाप चालक

कोणती पेन्शन नाही किंवा पैसा मिळवण्याची कोणती योजना नाही त्यामुळे घर चालवणे आता बिकट झाले आहे काही जणांचे गाड्यांची हप्ते देखील भागवता येणार नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आता आम्ही आमचे कुटुंब कसे चालवायचे मुलाबाळांच्या खाण्यापिण्याचा  प्रश्‍न आ वासून आमच्या समोर उभा राहिला आहे यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही तरी पर्याय शोधावा आणि तमाम महाराष्ट्रातील वडाप चालकांच्या बाबतीमध्ये एखादी योजना अथवा निर्णय जाहीर करून आम्हाला व आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी वडाप वाहतूक  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.स्वाभिमानी वडाप प्रवासी वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी साठे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोक बल्लाळ,वाळवा तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,रवींद्र रोकडे यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Politics : उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू खासदार देणार धक्का! ओमप्रकाश राजेनिंबाळकर ठाकरे गट सोडणार? धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप

IND vs AFG 2nd ODI: रोहित शर्माच्या खेळण्यावर अनिश्चितता? शुभमनसोबर ओपनर कोण? जाणून घ्या प्लेईंग इलेव्हन

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला राजस्थान गुप्तचर विभागाकडून अटक

Sanjay Raut : ३ मिनिटांत ४ वेळा साईबाबांची शपथ, राऊतांनी उल्लेख केलेला खासदार कोण? बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT