No use of watch during CET exam OMR sheets police security belgaum sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : सीईटीवेळी घड्याळ वापरण्यास मनाई

शिक्षण खात्याचा निर्णय : पेपर सुरु होण्यापूर्वी परीक्षार्थींची तीनवेळा तपासणी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीईटीवेळी परीक्षार्थीना घड्याळ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर ओएमआर शीटही पोलीस बंदोबस्तात पोचविल्या जाणार आहेत. तसेच पेपर सुरु होण्यापूर्वी परीक्षार्थींची तीनवेळा तपासणीही करण्यात येणार आहे. पीएसआय भरतीवेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या याचीच चर्चा सुरु आहे. परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे, येत्या २१ व २२ मे रोजी होणाऱ्या सीईटीवेळी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सीईटीबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे.

सर्व केंद्रांवर परीक्षार्थींची तब्बल तीनवेळा तपासणी केली जाणार आहे. कोणताही बोगस परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर जाऊ नये किंवा ब्लुटूथ हेडफोन अशा अत्याधुनिक उपकरणांचा परीक्षाकाळात वापर होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारचे घड्याळ वापरता येणार नसून ओएमआर शीट पुरविण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकासमवेत शस्त्रधारी पोलीस असतील. त्यामुळे शिक्षण खाते परीक्षेबाबत अधिक खबरदारी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेबाबतची मार्गसूची १४ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा जवळ आल्याने परीक्षार्थी अभ्यासात तर शिक्षण खाते सीईटीच्या तयारीत असे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात १७ हजार परीक्षार्थी

बेळगाव जिल्ह्यात २५ केंद्रांवर परीक्षा पार पडणार असून १७ हजारहून अधिक परीक्षार्थी आहेत. त्यामुळे, परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT