No fear of recession-unemployment, everything is smooth 
पश्चिम महाराष्ट्र

ना भय मंदी-बेरोजगारीचे, सारं काही सुरळीत... पण कुठे?

जयसिंग कुंभार

स्वीडन... संसदीय लोकशाही देश, समाजवादी विचारांचा, महाराष्ट्राच्या दीडपट आकाराचा, 95 लाख लोकसंख्येचा. जगभरात कोरोनाचा हाहाकार आणि टाळेबंदीने जीवन ठप्प असताना इथे मात्र संग्रहालये आणि चित्रपटगृहे वगळता सारे काही सुरळीत आहे. महामारीत जग तणाव-सामाजिक असुरक्षिततेने ग्रासले असताना हा देश मात्र शांतच ठामपणे रोवून उभा आहे. 

- धनंजय लोखंडे, स्टॉकहोम, स्वीडन 

स्वीडनच्या अंगवळणीच फिजिकल डिस्टन्सिंग आहेत. जगभर टाळेबंदीचा नारा दिला जात असताना इथे मात्र टाळेबंदी होणार नाही हे आधीच जाहीर केले. साधारण 15 मार्चपासून आपण यापुढे कसे वागायचे याचे काटेकोर नियम मात्र जाहीर झाले. त्यासाठी माध्यमांमधून प्रसिद्धी-घरोघरी पत्रक वाटप झाले. त्यामुळे आजही इथे बस-रेल्वे, हॉटेल्स, बार, दुकाने असं सारं काही जसंच्या तसं सुरू आहे. अगदी विमानेही. घरून कामाची सक्ती नाही. तरीही रेल्वेच्या पूर्ण डब्यात अवघे चार ते पाच प्रवासीच दिसतील. शाळा-महाविद्यालयात सुरक्षित अंतरावर बसून मुलं शिकताना दिसतील. बंद फक्त चित्रपटगृहे-संग्रहालये. 

सध्याच्या महामारीला सामोरे कसे जायचे याचा नेमका आराखडा सरकारकडे आहे. त्याबाबतचे सारे काही निर्णय तज्ज्ञ समितीच करते. तेच त्याची घोषण करतात. अँडर्स टेगणेल यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व्यवस्थेची टीम सर्व पातळ्यांवर काटेकोरपणे काम करतेय. जो काही निर्णय करायचा आहे तो निर्णय त्यांची तज्ज्ञ समितीच करते. इथे सरसकट चाचण्यांचा सपाटा नाही. लक्षणं दिसत असतील घरीच थांबा. कॉल करा डॉक्‍टरच तुमच्याकडे येतील. आवश्‍यक वाटल्यास तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातील. 

तळागाळातल्या नोकऱ्या-अर्थकारणाला कोणताही आर्थिक फटका बसलेला नाही. स्कॅनिया या ट्रक बनवणाऱ्या माझ्या कंपनीचं कामकाज नियमित असलं तरी जगभरातील टाळेबंदीमुळे आयात ठप्प झाल्याने शिफ्ट कमी झाल्या आहेत. त्यामुळे या महामारीचा जो काही आर्थिक फटका बसला आहे तो आमच्यासारख्या कंपन्यांनाच. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत माझ्या पगारातील 47 टक्के वाटा शासन देतेय. इथे कामगारांना सुरक्षा आहे. त्यांच्या संघटनांचा दबदबा. तसे कायदेही आहेत. 

इथे आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेची जबाबदारी शासनाचीच असते. ज्येष्ठांसाठी शासनाच्या निवृत्तीवेतनापासून आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत. आपल्यासारखी इथे एकत्र कुटुंब पद्धती नाही. ज्येष्ठ मंडळी इथे वृद्धाश्रमातच राहतात. मात्र ते सक्तीने नव्हे मर्जीने. 

जगभर महामारीने हाहाकार माजला असताना स्वीडन मात्र शांत-ठामपणे उभा आहे. इथे कोरोनाची टीव्हीवरील बातमी फक्त अपडेट देण्यापुरतीच असते. याचा अर्थ इथे कोरोनाचे रुग्ण नाहीत असे नाही. आत्तापर्यंत 3600 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. तीस हजारांवर चाचण्या झाल्या आहेत. मात्र म्हणून टीव्हीवर दररोज कोरोना रुग्णांची भयावह आकडेवारी सांगितली जात नाही तर फक्त वर्तन-व्यवहाराबाबतच्याच सूचना असतात. समाजात सकारात्मक दृष्टिकोन राहील असा त्यांचा हेतू असतो. पंतप्रधान स्टीफन लोफवें कधी तरीच टीव्हीवर दिसतात. 
शेजारच्या देशांमध्ये टाळेबंदी असल्याने अनेक परदेशी नागरिक सध्या इथे निवांतपणे रहायला म्हणून येत आहेत. स्वीडनचे हेच मोठे यश आहे. कोरोनाला सामोरे कसे जायचे याचे नेमकं आकलन शासनाला आहे आणि ते इथल्या नागरिकांनाही ते कळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT