khot 
पश्चिम महाराष्ट्र

खडसे, शेट्टींना नको, यांना करा आमदार; सदाभाऊ खोतांनी दिली राज्यपालांना यादी 

अजित झळके

सांगली ः राज्यपाल नियुक्त आमदार कुणाला करायचे, यावरून अजूनही विषय ताणलेले आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी सादर केलेल्या यादीला राज्यपाल भगतसिंह कोशारी मान्यता देतील की नाही, याबाबत गोंधळाची परिस्थिती आहे. त्यातही भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नावाला विरोध होईल, असेही सांगितले जात आहे.

अशावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी एक 12 नावांची एक वेगळीच यादी सादर केली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निकषात परफेक्‍ट बसणारे हे लोक आहेत, अशा लोकांची निवड करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. एकप्रकारे सदाभाऊंनी खडसे, शेट्टी राहू देत, या लोकाना आमदार करा, असे सुचवले आहे. 

सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सकाळी बाराच्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन त्यांना यादी सादर केली. त्यात सामाजिक कार्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे, लेखक विठ्ठल वाघ, विश्‍वास पाटील, क्रिकेटपटू झहीर खान, तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, सामाजिक कार्यासाठी अमर हबीब, प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, पोपटराव पवार, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आमटे, सत्यपाल महाराज आणि बुधाजीराव मुळीक यांचा समावेश आहे. या लोकांनी सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. अलौकिक काम करत ते समाजाला पुढे नेत आहेत. त्यांना आजवर कुठेही संधी मिळालेली नाही. राज्यपाल नियुक्त आमदार करून त्यांच्या कार्याचा सन्मान कराच, शिवाय धोरण ठरवणाऱ्या मोठ्या सभागृहाचे सदस्य करून त्यांच्या विचारांचा उपयोग करून घ्या, असे आवाहन खोत यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT