Not the leopard that Palus saw on Wednesday, Taras? 
पश्चिम महाराष्ट्र

पलूसला बुधवारी दिसलेला बिबट्या नव्हे, तरस ? 

संजय गणेशकर

पलूस : येथून एक किलोमीटरवर पुदाले वस्तीजवळ बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली होती. वनविभागाला कळवले असता, वनखात्याचे परिमंडळ अधिकारी मारूती ढेरे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केल्यानंतर मिळालेले ठसे हे बिबट्याचे नाहीत. तरस या वन्यप्राण्याचे असल्याची अंदाज व्यक्त केला. ठसे घेऊन तज्ञांकडे मार्गदर्शनासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रत्यक्ष पाहणी केली असता दिलीप कुलकर्णी यांच्या केळीच्या पाटात, बाजूच्या ऊसाच्या पाटात दोन वेगवेगळ्या पाऊलखुणा आढळल्या. हे दोन्ही माग पूर्व दिशेला जाऊन अस्पष्ट होतात. त्यामुळे बिबट्या की तरस याबाबत अजून अस्पष्टता आहे. नागरिकांत मात्र भितीचे वातावरण आहे. 
याबाबत माहिती अशी, की बुधवारी पलूसपासून एक किलोमीटरवर पुदाले वस्तीवर विनय करमरकर यांना वन्यप्राणी दिसला. तो बिबट्या असल्याचे त्यांनी सांगताच वनअधिकारी ढेरे व सहकारी, वन कर्मचाऱ्यांनी आज सकाळी परिसराला भेट दिली. त्यांनी ठशांची पाहणी करून तो बिबट्या नाही, तर तरस असावा असे सांगितले. 

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रात्री निर्जन भागात एकटे फिरू नये, काही दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती पलूस नगरपरिषदेतील कॉंग्रेस गटनेते सुहास पुदाले दिली. ठशाबाबतचा अहवाल तज्ञांकडून आल्यानंतर सांगण्यात येईल, असे वन अधिकारी ढेरे यांनी सांगितले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT