is.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

होम क्वॉरंटाईनची सक्ती मोडणाऱ्यांना नोटीस 

सकाळवृत्तसेवा

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महापालिका सज्ज असून, युद्धपातळीवर उपाययोजना करीत असल्याचे सांगून आयुक्त कापडणीस म्हणाले, त्याअंतर्गत शहरातील 30 हजार घरांचा सर्व्हे केला आहे. नागरिकांनी अत्यावश्‍यक कारण वगळता घराबाहेर पडू नये. कोरोनाचा धोका वाढण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्याअंतर्गत रॅपिड रिस्पॉन्सिबल टीम तयार केली आहे. याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर हे नोडल ऑफिसर आहेत. एकूण 20 प्रभागनिहाय 20 टीम आणि त्यांचे आरोग्य अधिकारी प्रमुख आहेत. 

आयुक्त कापडणीस म्हणाले, सुर्दैवाने महापालिका क्षेत्रात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. विविध 24 देशातून आलेल्या 56 जणांची शासनाकडून यादी आली होती. पण आपण घर टू घर सर्व्हे सुरू ठेवल्यामुळे परदेशात प्रवास करून आलेले 141 जण निष्पन्न झाले. त्यांना 14 दिवसांसाठी घरीच देखरेखीखाली ठेवले आहे. त्यांची दिवसातून आशा वर्कर तीनवेळा तर वैद्यकीय अधिकारी एकवेळा भेटून चौकशी करीत आहे. मी स्वत:ही काही ठिकाणी भेटी देऊन चौकशी केली. सर्वजण सहकार्य करीत आहेत. पण त्यातील काहीजण इतरत्र परस्पर सहली, फिरण्याचे उद्योग करीत आहेत. त्यांच्यामुळे इतरांना व त्यांनाही धोका होऊ नये यासाठी त्या सर्वांनाच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 
.......... 
महापालिकेत येऊ नका, ऑनलाईन कामे होतील 
कापडनीस म्हणाले, महापालिकेतील 50 टक्के यंत्रणा ही कोरोनाबाबत नियोजनासाठी तर 50 टक्के घरपट्टी, पाणीपट्टीसह कर वसुलीसाठी लागली आहे. त्यामुळे 50 टक्के कामाचा निकष अगोदरच पाळण्यात आला आहे. नागरिकांनीही कामासाठी महापालिकेत येऊ नये. त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर संपर्क साधून कामाचा पाठपुरावा करावा. त्यांची कामे करून घरबसल्या त्यांना कळविले जाईल. 
.............. 
फ्रान्सचा एकजण सांगलीत...! 
कापडनीस म्हणाले, फ्रान्समधील एकजण चार राज्ये फिरून आला आहे. तो एका लॉजवर थांबल्याची माहिती मिळाली. त्याबाबत चौकशी केली तर तो गेल्या चार महिन्यांपासून भारतातच असल्याचे समजले. तो पॉंडिचेरी येथे नोकरीस असून, त्याचा सांगलीतील एका तरुणीशी विवाह ठरलेला आहे. तो कोठेही परदेशात जावून आलेला नसल्याने धोका नाही. तरीही त्याच्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग! ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

Latest Marathi News Live Update : कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

Video: 'फक्त ७ तास...' टीम इंडियाच्या खऱ्या कबीर खानचा फायनलआधी स्पेशल मेसेज अन् विश्वविजयानंतर रोहितप्रमाणे मैदानात रोवला तिरंगा

Cancer Love Horoscope: कर्क राशीच्या प्रेम जीवनात आज काय खास घडणार? वाचा तुमचं राशिभविष्य

SCROLL FOR NEXT