notices issued to motorists traffic police in belgaum
notices issued to motorists traffic police in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

...म्हणून वाहनचालकांना देण्यात आल्या पुन्हा दंडाच्या नोटिसा

सकाळवृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाउन काळात पोलिसांनी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यावर ब्रेक लावला होता; पण गेल्या महिनाभरापासून वाहतूक नियंत्रण केंद्र (टीएमसी) पुन्हा सुरु केले आहे. विनाहेल्मेट वाहन चालविणे तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटिव्हीव्दारे नजर ठेवून नोटिसा धाडण्यात येत आहेत. त्यामुळे निर्धास्तपणे शहरात फिरणाऱ्या वाहचालकांना धक्‍का बसला आहे. 

लॉकडाउन काळात शहरातील वाहतूक रोडावल्याने पोलिसांना वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे थांबविले होते. स्पॉट फाईन घालण्यासह टीएमसीमधून नोटीस पाठविणेही बंद केले होते. त्यामुळे वाहनचालक निर्धास्त होते. लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्याने दिवसेंदिवस वाहतुकीत वाढ होत आहे. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस आता रस्त्यावर उतरत आहेत; पण बहुतेक जणांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना काळात वाहनचालकांकडून स्पॉट फाईन घेणे धोक्‍याचे होऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी आता वाहतूक नियंत्रण कक्षामधून वाहतूक व्यवस्थेवर नजर ठेवली आहे. महिनाभरापासून नोटिसा पाठविण्यात येत असून एकच व्यक्‍तीला अनेकवेळा नोटिसा पाठविल्या आहेत. पोस्टाद्वारे मिळालेल्या नोटिसामुळे अनेकांना धडकी भरली आहे. विनाहेल्मेट वाहन चालविल्यास 500 रुपये दंड असलेली नोटीस धाडण्यात येत आहेत. अन्य काही दिवस स्पॉट फाईनऐवजी टीएमसीमधूनच नोटिसा पाठविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. 

सीसीटीव्हीव्दारे नजर
लॉकडाउन आणि वाहतुकीचा काहीही संबध नाही. वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरणे पालन केले पाहिजे. त्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीव्दारे नजर ठेवण्यात येत असून टीएमसीमधून नोटिसा पाठविण्यात येत आहेत. 
-आर. आर. कल्याणशेट्टी, साहाय्यक पोलिस आयुक्‍त, वाहतूक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT