Now Chandrakant Gudewar has taken over as acting ceo 
पश्चिम महाराष्ट्र

आता चंद्रकांत गुडेवार "बिग बॉस'; प्रभारी सीईओपदाचा पदभार स्वीकारला

सकाळवृत्तसेवा

सांगली : "कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, ही माझी ओरिजनल प्रायोरिटी आहे', असे सांगत चंद्रकांत गुडेवार यांनी आज जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अभिजित राऊत यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर गुडेवार आता झेडपीचे "बिग बॉस' झालेत. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून प्रभारी पदभार सोपवावी, असे आदेशात म्हटले होते. त्यानुसार काल रात्री चर्चा झाली. श्री. राऊत यांनी श्री. गुडेवार यांच्याकडे पदभार सोपवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर लागलीच ते जळगावसाठी रवाना झाले. श्री. गुडेवार यांनी आज सकाळी पदभार स्वीकारत त्याच जोमाने काम सुरु केले.

त्यांनी महापूर नियंत्रणासाठीच्या यंत्रणा आधी हाती घेतल्या. सांगलीवाडी येथील जामदार यांच्या बोट निर्मिती कारखान्याला त्यांनी भेट दिली. तेथे किती बोटी उपलब्ध आहेत. पुढील काळात किती तयार होतील, यावर चर्चा केली. त्याआधी मिरज पंचायत समितीत अचानक भेट देऊन दप्तर तपासणी केली आणि तेथील एकाला निलंबित केले. 

गुडेवार यांचा लौकिक अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी असा राहिला. येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी मोजक्‍या काळातच धाक निर्माण केला आहे. "बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल', ही त्यांची सरळ कार्यशैली राहिली. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार आल्याने अनेकांचे धाबे दणाणलेत. त्यांच्याकडे सध्या बुर्ली, एरंडोली, नरवाड या तीन मोठ्या पाणी योजनांच्या चौकशीची जबाबदारी आहे. त्यातील बुर्ली प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता गुडेवार हेच "बिग बॉस' झाल्याने हे प्रकरण चांगलेच गाजणार हे नक्की मानले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT