Now Free Dialysis Service In Gadhinglaj
Now Free Dialysis Service In Gadhinglaj 
पश्चिम महाराष्ट्र

गडहिंग्लजला मिळणार मोफत डायलिसिस सेवा

अवधूत पाटील

गडहिंग्लज : येथील उपजिल्हा रुग्णालय गोरगरीब रुग्णांना आधारवड ठरत आहे. या रुग्णालयात लवकरच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. डायलिसिसची दोन युनिट कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गडहिंग्लजसह आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्‍यांतील गरजू रुग्णांची मोफत डायलिसिसची सोय होणार आहे. 

येथील उपजिल्हा रुग्णालयाची सुरवात 2005 साली झाली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून हे रुग्णालय उभे करण्यात आले. गडहिंग्लजसह शेजारच्या आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्‍यांतील रुग्णांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय आधारवड ठरले आहे. येथे विविध आजारांवर उपचार मिळू लागले आहेत. रुग्णालयाच्या कामकाजाबाबत काही वेळा तक्रारींचा सूर उमटतो; पण तो अपवाद वगळला तर या रुग्णालयातून गरजू रुग्णांना अनेक सुविधा मोफत उपलब्ध होतात, हे नाकारता येणारे नाही. गडहिंग्लजच्या विस्तारणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात शासकीय रुग्णालय म्हणून उपजिल्हा रुग्णालयाने आपले स्थान निर्माण केले आहे. 

शासनाने या रुग्णालयात आता डायलिसिस युनिट मंजूर केले आहे. दोन्ही किडण्या निकामी होतात, तेव्हा किडणीचे काम कृत्रिमरित्या चालविले जाते. रक्त शुद्धिकरणाच्या या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. अलीकडे विविध कारणांनी डायलिसिसची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यापूर्वी रुग्णांना डायलिसिससाठी कोल्हापूर अथवा बेळगावला जावे लागत होते. अलीकडे गडहिंग्लज शहरातीलच काही खासगी रुग्णालयांनी ही सुविधा उपलब्ध केली असून आता शासनाने उपजिल्हा रुग्णालयातही दोन डायलिसिस युनिट मंजूर केले आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना अन्य उपचारांप्रमाणेच डायलिसिसचा मोफत लाभ मिळणार आहे. 

डायलिसिसची दोन युनिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरओ प्लॅंट बसविण्याचे काम सुरू आहे. एका युनिटमध्ये दिवसाला कमीत कमी चार रुग्णांचे डायलिसिस होऊ शकते. म्हणजेच एका दिवसात दोन्ही युनिटवर आठ रुग्णांची व्यवस्था होईल. या युनिटसाठी सहा कर्मचारी मंजूर झाले आहेत. यामध्ये एक डॉक्‍टर, दोन टेक्‍निशियन, एक स्टाफ नर्स व दोन परिचरांचा समावेश आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात येते. 

जिल्ह्यात 2, तर राज्यात 67 
शासनाने शासकीय रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू केले जात आहे. त्याच पद्धतीने कसबा बावडा (कोल्हापूर) येथील सेवा रुग्णालयातही डायलिसिस युनिट कार्यान्वित होणार आहे, तर राज्यातील 67 शासकीय रुग्णालयात हे युनिट मंजूर झाले आहे. 

भरतीची प्रक्रिया सुरू

शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट मंजूर झाले आहे. त्याच्या उभारणीचे काम सुरू आहे. डॉक्‍टर्स व कर्मचारी भरतीची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच डायलिसिस कार्यान्वित होईल. 
- डॉ. दिलीप आंबोळे (वैद्यकीय अधीक्षक) 
उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT