police checking.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आता प्रशासनाचे ओळखपत्र असेल तर रस्त्यावर "एंट्री'

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोनाविरुध्दच्या लढाईत सर्वात महत्वाचा घटक आहे तो अत्यावश्‍यक सेवा. सामान्य जनतेला दूध, किराणा, भाजीपाला, औषधे या सेवा मिळण्यासाठी अनेक घटक कार्यरत आहेत. मात्र या घटकांचा आधार घेऊन अनेक रिकामटेकडे नुसतेच शहरात फिरत गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दी टाळण्याचा उद्देश सफल होत नाही. यावर आता सर्व अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना प्रशासनानेच ओळखपत्रे देण्याचा फतवा काढला आहे. 


कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन केले आहे. मात्र या काळात अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवल्या आहेत. त्यातही कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने डॉक्‍टरांनी आपले हॉस्पिटल काळजी घेऊन सुरु ठेवले आहेत. तर जनरल मेडिकल प्रॅक्‍टीशनर्सनी आपल्याला एखाद्या कोरोनाबाधिताचा संसर्ग व्हायचा आणि त्यातून इतरांना लागण व्हायची असे होऊ नये म्हणून ओपीडी सावधरितीने सुरु ठेवली आहे. 


महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल्स सुरु रहावित यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र या स्टाफकडे हॉस्पिटलची ओळखपत्रे असतात. ती ओळखपत्रे दाखवूनही अनेक रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवून दंडुके दिलेच शिवाय हॉस्पिटललाही सोडले नाही. त्यामुळे हॉस्पिटलच बंद ठेवण्याची वेळ काही डॉक्‍टरांवर आली होती. यावर प्रशासनानेच मार्ग काढला आहे. सांगली, मिरज आएमएला महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलच्या सर्व स्टाफची ओळखपत्रे प्रशासनाकडून दिली जातील असा फतवा काढला आहे. त्यामुळे त्यांची नावे आणि फोटो मागितले आहेत. लवकरच सर्व हॉस्पिटलच्या स्टाफला आता प्रशासनाकडूनच ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे हॉस्पिटल सुरळीत सुरु राहतील. 


महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र-
महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही शासनानेच ओळखपत्रे दिली आहेत. मुळात महावितरण कंपनीची स्वत:चे ओळखपत्र असतानाही या ओळखपत्रावरुन पेट्रोलपंप, पोलिसांच्याकडून अडवणूक असे होऊ लागल्याने अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शासकीय ओळखपत्र देण्यात आली आहेत. 


वॉडनिहाय ओळखपत्रे 
महापालिका क्षेत्रात प्रशासनाने घरपोच अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या दूध, किराणा, भाजीपाला विक्रेत्यांनाही ओळखपत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी वॉर्डनिहाय नोडल अधिकारी नेमले आहेत. त्यांच्यामार्फत ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे घरपोच सेवा देताना ओळखपत्र असलेलेच विक्रेते वॉर्डमध्ये फिरतील. 


अत्यावश्‍यक सेवा 2020-
शासनाने दिलेल्या ओळखपत्रावर "अत्यावश्‍यक सेवा संचारबंदी 2020' असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यावर सदर कर्मचारी कोणत्या सेवेशी संबंधित आहे, त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप, पोलिस यांच्याकडून अडवणूक होणार नाही. शिवाय खोटे ओळखपत्रे घेऊन फिरणाऱ्यांनाही आळा बसणार आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT