Now look at the report of those 16 people, it has moved to Corona positive 
पश्चिम महाराष्ट्र

जीव टांगणीला ः आता लक्ष त्या १६जणांच्या रिपोर्टकडे, तो कोरोना पॉझिटीव्ह दुसरीकडे हलवला

सकाळ वृत्तसेवा

नगर ः  "" जिल्ह्यात कोरोना बाधित एक रुग्णाचा पुणे प्रयोग शाळेत पाठविलेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्तीला जिल्हा रुग्णालयातील गर्दी लक्षात घेता, त्याला बुथ हॉस्पिटलमध्ये विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. दुबई, इटलीवरून ज्या काही व्यक्ती नगरमधील लोकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यातील हायरिस्क व लोयररिस्क अशा 16 जणांचे सॅम्पल पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. लवकरात-लवकर तेही रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त होणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात "कोरोना' आजाराबाबत पत्रकारांशी द्विवेदी बोलत होते. जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोनासंदर्भात प्रशासनाचा पूर्ण वॉच ठेवला जात आहे. यासंदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी यांनाही खबरदारीच्या सर्व उपाययोजनांचा प्रसार-प्रचार करण्याचे निर्देश दिले आहे. विदेशातून, समुद्रमार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांचे "स्क्रिनिंग' केले जात आहे.

यापुढे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे गर्दी होईल, असे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टूर्स अँड ट्रव्हल्स यांच्यामार्फत सहली आयोजित करणाऱ्या अकरा लोकांची नावे दिली आहे. खासगी शाळेने स्वतःच्या निर्णयाने शाळा बंद ठेवू शकता, अशा सूचना दिल्या आहे.

कोरोनासंदर्भात पीसीआर ही तपासणी केली जाते. "कोरोना' आजारासाठी डॉक्‍टर, पेशंट सोडून कुणालाही "मास्क' वापरण्याची गरज नाही. आवश्‍यकता असल्यास साधा रुमाल वापरला, तरी भीतीचे कारण नाही. तसेच साबणाने नियमित हात धुणे महत्त्वाचे आहे.'' जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबीकर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, आपत्ती व्यवस्थापक प्रमुख डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते. 

चित्रपटगृहांनी स्वच्छता ठेवा अन्यथा कारवाई 
चित्रपटगृहांना स्वच्छता ठेवण्यासंदर्भात सक्त निर्देश दिले आहे. स्वच्छता ठेवण्यात कोणत्याही प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही. जबाबदारीचे भान प्रत्येक चित्रपटगृहांनी दक्षता पाळणे गरजेचे आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला. 

""जगभरात "कोरोना व्हायरस'ने धुमाकूळ घातला असला, तरी जिल्हावासियांनी "कोरोना'ला घाबरू नका, स्वच्छता राखा, काळजी घ्या, कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही. या आजाराचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा समर्थ आहे,'' असा धीर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना दिला आहे.

खबरदारीच्या उपाययोजना 
- श्‍वसनाचा विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना काळजी घेणे 
- हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत 
- शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा 
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये 
- फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत 
- हस्तांदोलन टाळावे. 
- चेहरा, नाकास वारंवार हाताने स्पर्श करू नये 
- गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT