bharat gas.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आता "व्हॉटस्‌ ऍप' वरून गॅसची नोंदणी करा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- भारत पेट्रोलियम ने घरगुती ग्राहकांना आता "व्हॉटस्‌ ऍप' द्वारे गॅस नोंदणीसाठी सुविधा दिली आहे. त्यासाठी कंपनीने संपूर्ण देशात एक स्मार्टलाईन क्रमांक जाहीर केला आहे. गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून "व्हॉटस्‌ ऍप' द्वारे गॅसची मागणी नोंदवू शकतो अशी माहिती कंपनीचे विभागीय विक्री व्यवस्थापक संदीप मिश्रा यांनी दिली. 

गॅस नोंदणीसाठी यापूर्वी फोन करून क्रमांक कळवावा लागत होता. अलिकडे गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून "कॉल' केल्यास तत्काळ नोंदणी होऊन संदेश प्राप्त होतो. आता सुविधेमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून "व्हॉटस्‌ ऍप' द्वारे गॅसची मागणी नोंदवण्याची सुविधा बीपीसीएल ने आणली आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरात कंपनीने 1800224344 हा स्मार्ट लाईन नंबर जारी केला आहे.

ग्राहकांनी गॅस एजन्सीकडे नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर हा क्रमांक सेव्ह करायचा आहे. त्यानंतर "व्हॉटस्‌ ऍप' वरून या क्रमांकावर "हाय' असा संदेश पाठवावा. त्यानंतर मोबाईलवर तत्काळ "बुक माय रिफील' असा संदेश येईल. तेव्हा परत "1' क्रमांक टाईप करून संदेश पाठवावा. त्यानंतर गॅसची मागणी नोंदवली जाऊन नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. तसेच सोबत एक "लिंक' देखील ग्राहकांना मिळेल. त्यावर जाऊन ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट देखील करता येईल. त्यामुळे "कोरोना' पासून दूर राहू शकतो. सांगली जिल्ह्यात बीपीसीएल कंपनीच्या 20 हून अधिक एजन्सी आहेत. तसेच गॅस ग्राहक संख्या तीन लाखापर्यंत आहे. त्यामुळे बीपीसीएल च्या या सर्व ग्राहकांना अद्यावत सुविधेचा लाभ मिळू शकतो असेही श्री. मिश्रा यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT