o god leopard is coming 
पश्चिम महाराष्ट्र

बाबो.. बिबट्या घुसला नगरमध्ये 

सकाळ वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत आहे. निघोज, संगमनेर तालुक्‍यातील लोकांचे जीणेच हराम झाले आहे. प्रातर्विधीसाठी जातानाही ते एकमेकांची सोबत करतात. रात्री शेतात पिकांना पाणी भरण्यास जातानाही सोबत विजेरी किंवा अन्य संरक्षणाचे साहित्य ठेवतात. ही झाली गावाकडची कथा. तो जंगलातील बिबट्या थेट नगरमध्ये घुसला आहे. त्याचे दर्शन झाल्याने केडगावसह नगर शहरातील नागरिक घाबरून गेले आहेत. 

गेल्या दोन दिवसांपासून केडगाव परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. 


केडगाव येथील देवी रस्त्यावर काल (ता. 16) रात्री आठच्या सुमारास माजी नगरसेवक सुनील कोतकर यांना बिबट्याने दर्शन दिले. रस्त्याने जाताना 10 फुटांवरून बिबट्या गेल्याचे कोतकर यांनी सांगितले. या बाबत त्यांनी नगरसेवक मनोज कोतकर व इतरांना माहिती दिली. त्यानंतर आज सकाळीही आणखी दोघांना बिबट्याने दर्शन दिले. नगरसेवक कोतकर, तान्हाजी पवार, लक्ष्मण कोतकर, सुनील कोतकर, गणेश नन्नवरे, सुभाष कोतकर, बच्चन कोतकर आदींनी या परिसरात फिरून पाहणी केली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. वन अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यात त्यांना कुठेही बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. मात्र, तरीही बिबट्या दिसल्यानंतर घ्यायच्या खबरदारीबाबत त्यांनी नागरिकांना माहिती दिली. दरम्यान, बिबट्याच्या धास्तीने या परिसरातील शेतमजुरांनी दुपारीच घर गाठले. आता नागरिकही घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने वेगळेच संकट उभे राहिले आहे. 

देवी रस्त्यावर गुरुवारी रात्री आपल्या समोरून दहा फुटांवरून बिबट्यास जाताना पाहिले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावावा. 
- सुनील कोतकर, माजी नगरसेवक 

केडगाव परिसरात पाहणी केल्यानंतर बिबट्याचे ठसे मिळून आलेले नाहीत; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. बिबट्या दिसल्यावर तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा. 
- सुनील थिटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नगर


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT