Obeying the rules is the shield; Advice from Central Health Squad in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

नियम पाळणे हीच कवचकुंडले; केंद्रीय आरोग्य पथकाचा सल्ला

शिवाजी चौगुले

कामेरी (जि. सांगली) : शासकीय यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्‍टर्सनी सांगितलेले नियम पाळून संपर्कातील अंतर ठेवून राहणे, हीच कोविडपासून आपणास वाचवण्यासाठी कवच कुंडले ठरतील, असे मत केंद्रीय आरोग्य नियंत्रण संस्थेच्या कोविड पाहणी पथकाचे सहसंचालक डॉ. प्रणयकुमार वर्मा यांनी तुजारपूर गावभेटी वेळी व्यक्त केले. 

केंद्रीय आरोग्य पथक आज वाळवा तालुका पाहणी दौऱ्यावर आले होते. डॉ. वर्मा यांनी येलूर, कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे येडेनिपाणी उपकेंद्र, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इस्लामपूर, कोविड केअर सेंटर दत्त टेकडी या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला. समितीत सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय साळुंखे, सांगली सिव्हिल सर्जन डॉ. मिलिंद पोरे, डॉ. नामदेव पवार, डॉ. संतोष पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील हे त्यांच्या समवेत होते.

यावेळी त्यांनी वाळवा तालुका कोविड परिस्थितीचा आढावा घेत असता, तुजारपूर या छोट्या गावात कोविड रुग्णसंख्या वाढलेली पाहून अचानक तुजारपूर ग्रामपंचायतीस भेट दिली. यावेळी तुजारपूरच्या सरपंच अस्मिता पाटील, तुजारपूरचे पोलिसपाटील वसंत पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा कदम उपस्थित होते. 


पथकाने कोविड केअर सेंटर दत्त टेकडी इस्लामपूर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर आयुर्वेदिक दवाखाना येडेनिपाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर इत्यादी ठिकाणी भेट देऊन कोविड कामकाज पाहिले. हॉस्पिटलमधील सर्व सुविधा, रुग्णांची सोय, उपलब्ध साहित्य व औषधपुरवठा, कोविड लसीकरणाचे कामकाज, कंटेन्मेंट झोनमधील कामकाज इत्यादी गोष्टी पाहिल्या. पथकाने सर्व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. 


यावेळी उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरसिंह देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रानोजी शिंदे उपस्थित होते. तसेच आयुर्वेदिक दवाखाना येडेनिपाणी येथे कोविड लसीकरण कामकाज पाहिले त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, सरपंच डॉ सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलीकर उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर येथे कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. त्या ठिकाणी डॉ. दिलीप पाटील उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT