The old rapists baby is growing in that girls stomach 
पश्चिम महाराष्ट्र

त्या मुलीच्या पोटात वाढतेय वृद्ध बलात्काऱ्याचे बाळ... आता कायद्याची अडचण

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्यातील एका गावात 52 वर्षाच्या नराधम वृद्धाने एका अल्पवयीन मुलीवर ऐन दिवाळ सणाच्या काळात अत्याचार केला. त्यावेळी त्या मुलीने ही घटना कोणाला सांगितली नाही. आता पोटात दुखू लागल्याने तिला आईने दवाखान्यात नेलं, डॉक्टरांचा रिपोर्ट एेकून ते हबकूनच गेले. कारण ती आहे सहा महिन्यांची गर्भवती...आता पुढं काय... असा प्रश्न त्या गरीब कुटुंबापुढे उभा राहिलाय...

पारनेरात घडली घटना

पारनेर तालुक्यातील एका गावात मेंढपाळाच्या कुटुंबात ही घटना घडली आहे. गेल्या दिवाळी सणात त्या मुलीवर अत्याचार झाला. हे कुटुंब एका गावात मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तेथे ते काही दिवस त्यांचा मुक्काम होता. मेंढपाळाचा जेथे मुक्काम होता,  त्यांच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील 52 वर्षीय वृद्धाचं त्या मेंढपाळ कुटुंबाकडे येणंजाणे होतं. त्यामुळे कोणाला त्याच्या नियतवर संशय आला नाही. एेके दिवशी संधी साधून त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

तिनं घरी सांगितलंच नाही

घाबरलेल्या त्या मुलीने कोणालाच ही घटना सांगितली नाही. काही दिवसांनी त्यांनी गाव सोडलं. मुक्काम दर मुक्काम करीत ते फिरत राहिले. नेहमी पोटाची भ्रांत असलेल्या या कुटुंबाचे आरोग्याकडे लक्ष असण्याचं कारण नव्हतं. कदाचित तिच्या आईचंही दुर्लक्ष झालं. मुलीला मासिक धर्म (पिरिअड) येतो की नाही याची शहानिशा झाली नाही. त्यामुळेच तिच्या पोटात ते अत्याचाराचं बाळ वाढत राहिलं.

गेल्या आठवड्यात लक्षात आलं

गेल्या आठवड्यात या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला नगरच्या जिल्हा रूग्णालयात भरती केले गेलं. त्या वेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. या कुटुंबातील सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. अाता काय असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला.

अत्याचार करणारा वृद्ध अटकेत

त्यांनी पारनेर पोलीस ठाण्यात सात मार्चला संबंधित आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. आरोपी अटक झाला. मात्र, या अल्पवयीन मुलीच्या जीवनातील मोठा प्रश्न अाता तिच्या पालकांसमोर निर्माण झाला आहे. कारण अाता  ती  24 आठवड्याची गर्भवती आहे. 

परवानगीत चालले दिवस

तिच्या इच्छेने अाता गर्भपात करण्याचे ठरले आहे. मात्र, त्यासाठी अनेक दिव्य पार करावी लागत आहेत. त्या मुलीचा गर्भपात करायचा आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. परंतु ती २४ आठवड्याची गरोदर असल्याने जिल्हा न्यायालयाने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घेण्याचे सूचवले. कारण जिल्हा न्यायालय २४ आठवड्याच्या आत गरोदर असलेल्या प्रकरणातच परवानगी देते. मात्र, वैद्यकीय अधिकारी रिस्क घेण्यास तयार नाहीत. संबंंधित पालकांनी आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. यात भराभर दिवस निघून चालले आहेत. जास्त दिवस झाल्यास त्या मुलीच्या जिवाला धोका होऊ शकतो. डॉक्टरांनी तसे कळवले तर पुन्हा न्यायालय गर्भपाताची परवानगी नाकारू शकते. मग मात्र बाळाला जन्माला घातल्याशिवाय गत्यंतर नाही. दुसरीकडे मुलगी अल्पवयीन असल्याने बाळंतपणात तिच्याही जीवाला धोका होऊ शकतो, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

अाता यात नेमका दोष कुणाचा...याचा सवाल विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT