निपाणी : येथील रस्त्यावर होणारी गर्दी. 
पश्चिम महाराष्ट्र

'ओमिक्रॉन'ने वाढविली चिंता, निपाणीकर मात्र बिनधास्त!

मास्क गेला कचऱ्यात : सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरही नाही

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच निपाणी तालुक्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हाहाकार अनुभवला आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. 'ओमिक्रॉन' या नव्या विषाणूने दस्तक दिली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने कोरोनाप्रमाणेच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण अद्यापही निपाणी परिसरातील नागरिक बिनधास्त असल्याचेच चित्र विविध शासकीय कार्यालयासह बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयात येथील शासकीय अधिकारी व नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे येथील प्रशासकीय भवन, विविध केंद्र आणि व्यवसायाच्या ठिकाणी पाहणी केली असता नागरिकांचा मास्क हनुवटीवर नाही, तर चक्क कचरयात गेल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा कुठेही ठावठिकाणा दिसत नाही. कार्यालयाकडूनही काहीच उपाययोजना नसल्याने ही परिस्थिती धोका वाढविणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. आता जनजीवन सुरळीत यायला लागले तर नव्या आजाराने तोंड वर काढले आहे. या आजाराच्या भीतीने का होईना नागरिक आता लसीकरणाकरिता गर्दी करीत आहे. पण याही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. मास्क आता वापरणारे ही कमी झालेले दिसतात.

शासनाने कोरोनाकाळात सर्वांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सावटातून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत प्रत्येकाने नियमांचे पालन करण्याची गरज आहे. पण नागरिक नियमांचे पालन न करता बिधनास्त फिरत असल्याचे त्यांना भीती नसल्याचे दिसत आहे.

प्रवेशद्वारावरील सॅनिटायझर गायब

निपाणी शहरात नगरपालिका आणि विविध कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत इतरांना प्रवेश नाकारत सॅनिटायझरची सुविधा होती. पण सुरळीत झाल्यानंतर आता सॅनिटायझरही दिसेनासे झाले आहे. यापूर्वी कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षक तापमान मोजून हातावर सॅनिटायझर टाकत होते. सॅनिटायझर मशीनही बसविली होती. आता ही मशीन बंद असून सॅनिटायझर देणारा सुरक्षा रक्षकही दिसत नाही.

पुन्हा उगारणार कारवाईचा बडगा?

आरोग्याच्या दृष्टिकोणातून शासनाने नियमावली जाहीर केली असून निर्बंधही घातले आहेत. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिग आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असल्याने याकरिता पुन्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच बिनधास्तपणे वागण्याऐवजी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नागरिकांनी आताच मनावर घेतले नाही तर प्रशासनाचा दंडुका महागात पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: RCB च्या नव्या शिलेदाराचं खणखणीत शतक, तर वैभव सूर्यवंशीची फिफ्टी; भारताला उभारला धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : सटाण्यात रिपब्लिकन सेनेकडून गिरीष महाजन यांच्या प्रतिमेचे दहन

'असली भांडणं कुठून शिकतेस?' शशांक केतकरने बायकोला विचारला प्रश्न, प्रियंकानं बिग बॉसचा शो दाखवत केलं असं काही की... viral video

Video: मिरा-भाईंदरमध्ये बांधला १०० कोटींचा 'विचित्र' पुल! ट्रोल झाल्यावर MMRDA चं स्पष्टीकरण; मनसेनं इंजिनिअर्सना दिला 'वस्तरा'

T20 World Cup खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला, तर निघू शकतात दिवाळे; जाणून घ्या काय होऊ शकतात परिणाम

SCROLL FOR NEXT