Amitabh Bachchan esakal
पश्चिम महाराष्ट्र

जगातील सर्वात मोठं Covid Center कोणतं?

सकाळ डिजिटल टीम

देशात कोणताही नवा व्हेरियंट येणार म्हटलं, की सगळ्यात आधी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारा हा रस्ता बंद होतो.

बेळगांव : कर्नाटकात (Karnataka) ओमिक्रॉनचे (Omicron Variant) दोन रूग्ण आढळल्याने राज्य प्रशासन अधिक सतर्क झालंय. राज्यात येणाऱ्या लोकांना दोन डोस घेतल्याची सक्ती करण्यात आली असून कोगनोळी (ता. निपाणी) टोलनाक्यावर तपासणी केली जात आहे. आणि याच कारणानं सध्या कोगनोळी (ता. निपाणी) टोलनाका (Kognoli Toll Plaza) चर्चेचा विषय बनलाय. राज्यात ओमिक्रॉनच्या दोन रुग्णांची पुष्टी होताच, सोशल मीडियावर एकापेक्षा-एक मीम्स व्हायरल होत आहेत. सध्या ट्विटरवर #OmicronVariant ट्रेंड करताना दिसत आहे.

Kognoli Toll Plaza

ओमिक्रॉन विषाणू दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आला आणि सीमावर्ती बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील 23 चेकपोस्टवर आरटी-पीसीआर अहवालाची कडक तपासणी पुन्हा सुरू झाली. त्यातच कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? अशीही विचारणा केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांनाही आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं बंधनकारक असेल. कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला. तर, कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक सरकारनं पुन्हा चेकपोस्ट लावलेत.

Kognoli Toll Plaza

सध्या कोरोनामुळं कोगनोळी टोलनाका चर्चेचा विषय बनलाय. बच्चनसाहेब (Amitabh Bachchan) विचारतायत... जगातलं सर्वात मोठं कोव्हिड टेस्टिंग सेंटर (Covid Testing Center) कोणतं? सोशल मीडियावर त्याचं उत्तर आहे कोगनोळी नाका. देशात कोरोनाची संख्या वाढली किंवा एखादा नवीन व्हायरस आढळला की चर्चेत येतो कोगनोळीचा चेक पोस्ट). महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या या चेक पोस्टची धास्ती उत्तर भारतातील नागरिकांनी देखील घेतलीय. हा चेक पोस्ट इतका चर्चेचा विषय का बनलाय की, यावरती भन्नाट मीम्स बनताहेत. देशात कोणताही नवा व्हेरियंट येणार म्हटलं की सगळ्यात आधी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारा हा रस्ता बंद होतो, मग ते केंद्राचे निर्देश असो किंवा नसो. कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर हा नाका आहे. कोगनोळी गावाजवळ असलेल्या नाक्यामुळं याचं नाव कोगनोळी नाका असं पडलंय.

Kognoli Toll Plaza

पुणे-बंगळुरु हायवेवरचा टोलही याच नाक्यावर वसूल केला जातो. हा नाका निपाणीच्या हद्दीत येतो. दोन्ही राज्यांनी प्रवाशांची तपासणी कडक केल्याने इथे सध्या कायमच वाहनांच्या रांगा लागतात. कधीकधी भांडणं होतात, पोलिसांशी हुज्जत घालतात आणि मग फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी असे मीम्स तयार होतात. RT-PCR तपासणीसाठी NH4 हायवेवरील कोगनोळी चेकपोस्टवर सध्या वाहनांच्या रांगा लागत असून वाहनधारकांसह प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं ओमिक्रॉन आफ्रिकेत आणि कडक तपासणी कोगनोळी नाक्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Kognoli Toll Plaza

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT