corona new logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कुंडलमध्ये मुंबईहून आलेल्या एकास कोरोनाची लागण

सकाळवृत्तसेवा

कुंडल (सांगली)- कुंडल (ता. पलूस) येथे आज एका 55 वर्षीय पुरूषास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कुंडल शहरात भितीचे वातावरण झाले. 

कुंडल येथे मुंबईवरून आलेल्या कुटुंबास "होम क्वारंटाईन' करण्यात आले होते. त्यातील 55 वर्षीय पुरूषामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र वय 55 वर्षाच्या पुढील असल्याने 9 जून रोजी कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी "स्वॅब' घेण्यात आला होता. त्याचा तपासणी अहवाल आज "पॉझिटीव्ह' आला. त्यानंतर त्या व्यक्तीला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. तसेच त्यांच्या संबंधातील इतर 16 जणांचे "स्वॅब' घेवून त्यांना पलूस येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.

कुंडलच्या या रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे कळताच तहसिलदार श्री. पोळ, गटविकास अधिकारी राहूल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. किरण भोरे, कुंडल पोलीस ठाण्याच्या संगिता माने, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार, उपसभापती अरूण पवार, ग्रामविकास अधिकारी एस. ए. कुलकर्णी आदींनी परिसराला भेट दिली. रूग्ण राहत असलेला "सील' केला. दरम्यान गट विकासअधिकारी राहूल रोकडे यांनी, नागरिकांनी घाबरून न जाता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT