One crore rupees funds came to the municipalities 
पश्चिम महाराष्ट्र

नगरपंचायतींना दिवाबत्तीसाठी सव्वा कोटी! 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते या नागरी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना सहाय्य योजनेंतर्गत सव्वा कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील शिर्डी, अकोले, कर्जत, पारनेर, नेवासे या नगरपंचायतींचा समावेश आहे.

नगरविकास विभागाकडून प्रत्येकी 25 लाख रुपये मिळालेला निधी संबंधित नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेत आणखी नव्याने भर पडणार आहे. 

नगरपंचायतींना विशेष अनुदान म्हणून निधीसाठी 20 ऑगस्ट 2019 मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार महाविकास विकास आघाडीच्या सरकारने राज्यातील नगरपंचायतींना नागरी सुविधेसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचे विशेष सहाय्य अनुदान जिल्हा प्रशासनाकडे अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर पाठविण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मान्यतेनंतर सव्वा कोटींचा निधी संबंधित नगरपंचायतींना वर्ग करण्यात आला.

या निधीतून नागरी सुविधेची मूलभूत कामे केली जाणार आहे. या सर्व कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे. ""नागरी सुविधेच्या अनुषंगाने शासनाकडून मिळालेला निधी निश्‍चित कालावधीत खर्च होणे अपेक्षित आहे.

याबाबतच्या सूचना संबंधित नगरपंचायतींना देण्यात आल्या आहे,'' अशी माहिती प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांनी दिली. 


निधीतून सुविधेची कामे सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच होतील. खासगी स्वरूपाच्या कामांना यात थारा दिला जाणार नाही. यात ई-निविदा कार्यप्रणालीचा अवलंब बंधनकारक आहे. प्रकल्पांतर्गत शासनाने निश्‍चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता नगरपंचायत प्रशासनाने काटेकोरपणे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT