one dead in accident athani belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :अथणीत भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

अथणी : येथील अनंतपूर रस्त्यालगत बसवेश्वर चौकात दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातातत एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. मंगळवारी (ता. १) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर परशराम मादर (वय 20, रा. कृष्णा कित्तूर, ता. कागवाड) असे मयताचे नाव आहे. अथणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, अथणी येथील बसवेश्वर चौकात रोज सायंकाळी गर्दी असते. यावेळी ओव्हरटेक करताना खडी भरून निघालेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. त्यात सागर मादर हा चाकात अडकून जाग्यावरच ठार झाला तर इरशाद सय्यद सनदी (वय 20, रा. किरणगी, ता. अथणी) आणि लखन गणपती मादर (वय २१, रा. ऐगळी, ता. अथणी) हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी मोठी गर्दी झाली होती. अथणी सरकारी दवाखान्यात प्रथमोपचारानंतर जखमींना मिरज येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अथणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.  


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Delhi Mumbai Expressway Accident : सीएनजी लिक होऊन धावती कार पेटली; वैष्णोदेवी दर्शनाहून परतणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

SCROLL FOR NEXT