one dead in accident benadi 
पश्चिम महाराष्ट्र

बेनाडीजवळील अपघातात जयसिंगपूरचा दुचाकीस्वार ठार

संजय साळुंखे

बेनाडी : येथील निपाणी-हुपरी राेडवर डाॅ. देवल यांच्या घराजवळ शनिवारी (ता. ६) रात्री झालेल्या अपघातात जयसिंगपूर येथील दुचाकिस्वार जागीच ठार झाला. विपूल भूपाल पाटील (वय ३५, रा. संभाजीपूर-जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेला अपघात नेमका कसा झाला? हे मात्र पाेलिसांसह घटनास्थळावरील लाेकांना समजू शकलेले नाही. 


याबाबत अधिक माहिती अशी, ३५ वर्षीय दुचाकीस्वार  आज (ता. ६) रात्री बेनाडीहून कुन्नूरच्या दिशेने जात हाेता. येथील डाॅ. देवल यांच्या घराजवळ आल्यावर दुचाकीला अपघात झाला. नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला की अज्ञात वाहनाने धडक दिली, हे स्पष्ट हाेत नव्हते. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली.  दुचाकीस्वार मुरगूडहून जयसिंगपूरकडे जात हाेता. अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी हाेती. रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आला. घटनेची नोंद करण्याचे काम पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT