0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात वाढतोय कोरोना! वैरागमध्ये एकाचा मृत्यू, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा तालुक्‍यात 'या' ठिकाणी सापडले रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील कोरोना या विषाणूला आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाची दमछाक होत असतानाच आता कोरोनाचा जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये विळखा वाढू लागला आहे. अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर व पंढरपूर या तालुक्‍यात दररोज रुग्ण आढळू लागले आहेत. 

ठळक बाबी.... 

  • जिल्ह्यातील केवळ चार हजार 238 संशयितांच्याच झाल्या कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत मंगळवेढा वगळता अन्य तालुक्‍यांमध्ये आढळले 415 कोरोनाबाधित 
  • 415 रुग्णांपैकी 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; 178 जणांनी केली कोरोनावर मात 
  • शुक्रवारी सापडले 15 रुग्ण; वैरागमधील 58 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू

माळशिरस, मंगळवेढा, सांगोला कोरोनामुक्‍त 
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा पहिल्यापासूनच कोरोनापासून चार हात लांब राहिला आहे. तर माळशिरस व सांगोला तालुक्‍यात आढळलेले सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्‍कलकोट तालुक्‍यात कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. 2) करमाळ्यातील जिंती व खडकपुरा याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच अक्‍कलकोटमधील समर्थ नगर, विजय नगर व करजगी याठिकाणी प्रत्येकी एक, तर बार्शीतील भवानी पेठ, आदर्श नगर (नागणे प्लॉट), सब जेल तहसिल ऑफिस आणि वैरागमध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैरागमधील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तसेच दक्षिण सोलापुरातील होटगी, हत्तूर व कुंभारी याठिकाणी प्रत्येकी एक सापडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Cigarette Price Hike: सिगारेट पुन्हा महाग! तब्बल 51% वाढली किंमत; नवीन दर काय?

Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

Marathi News Live Updates : SIR वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण: सर्व निर्णय एकमताने घेतले

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

SCROLL FOR NEXT