One injured in hotel explosion in city 
पश्चिम महाराष्ट्र

Video : नगरमध्ये हॉटेलमध्ये स्फोट, एकच धावपळ

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असलेल्या पटवर्धन चौकामध्ये एका हॉटेलमधील गॅस टाकीचा आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात एक व्यक्ती भाजला गेला. स्फोटानंतर हॉटेलमध्ये आग भडकली. हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची भीतीने धावपळ झाली. याची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


पटवर्धन चौकातील आनंद भुवन या हॉटेलमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास चहा व इतर पदार्थ बनविण्याचे काम चालू असताना अचानक गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत हॉटेलमधील स्वयंपाक घराला आगीने वेढा दिला. यात एक कर्मचारी भाजला गेला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक एक बंबासह घटनास्थळी दाखल झाले .अग्निशमन पथकाने आगीवर नियंत्रण मिळवत हॉटेलमधील गॅसच्या टाक्या आगीपासून वेगळ्या केल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या आगीत वीज वाहक तारा जळाल्या शॉर्टसर्किट होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाने परिसरातील वीज प्रवाह काही काळ खंडित केला होता.

या हॉटेलच्या वरच्या भागात असलेल्या घरातही आगीची झळ पोहोचण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमन विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. गेल्याच महिन्यात  औरंगाबाद रस्त्यावरील एका गादी कारखान्याला मोठी आग लागली होती. त्यात लाखो रूपयांचे नुकसान झाले.

शहरात बहुतांशी हॉटेलांमध्ये घरगुती गॅस टाक्यांचा वापर केला जातो. रस्त्यावरील हातगाड्यांवरही तीच स्थिती असते. त्याची निगाही व्यवस्थितरित्या घेतली जात नाही. त्यामुळे स्फोटाचा मोठा धोका असतो. किमान या घटनेनंतर तरी पुरवठा विभागाने या हॉटेलांमध्ये जाऊन झडती घेतली पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT