j6MtpgQRYeYTJ2Xvuvtz8f-320-80.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बचतगट तयार करणार एक लाख मास्क ः वाचा कुठे.. 

दीपक पवार

आळसंद (सांगली) : कोरोनाचा ससंर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खानापूर पंचायती समितीने आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगटाद्वारे एक लाख मास्क तयार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. तो आता पुर्णात्वास येत आहे.

मास्क तयार करण्याच्या कामातून तालुक्‍यातील बचतगटातील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. पंचायत समितीच्या राबविलेल्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तालुक्‍यातील प्रशासन गतिमान झाले आहे. तालुक्‍यातील लोक गलाई व्यवसायासाठी देशभर विखुरलेले आहेत. कोरोना च्या धास्तीने लोक गावाकडे आले आहेत. परगावाहून आलेल्यांवर आरोग्य विभागाचा वॉच ठेवण्यात आला आहे. 

सभापती महावीर शिंदे, उपसभापती सरिता माने, गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती च्या वतीने मास्क निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोंदणीकृत बचत गटांना मास्क निर्मितीचे काम देण्यात आले आहे. 

सुमारे चाळीस बचतगटांना मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. अंतिम टप्प्यात आले आहे. बचतगटांना पंचायत समितीकडून कापड, लेन्स देण्यात आले आहे. बचतगटांनी सुरू केलेल्या मास्क निर्मितीच्या उपक्रमाचे तालुक्‍यातून कौतुक होत आहे. 
पणतालुक्‍यातील आरोग्य, महसुल व पोलीस प्रशासन रात्री- दिवस सर्तक राहिले आहे. तालुक्‍यात मास्कची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत होती. त्यावर मात करणे शक्‍य झाले आहे. 


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगट : 40 
सहभागी महिला : सुमारे 70 ते 75 
रोजगाराच्या नव्या दालने 
................ 

 

"तालुक्‍यातील 64 गावांतील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नोंदणीकृत बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उद्योग बंद अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत महिलांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात आले. सुमारे एक लाख मास्क तयार करण्याचे मानस आहे. ते अंतिम टप्प्यात आहे." 

संदीप पवार , 
गटविकास अधिकारी खानापूर पंचायत समिती, विटा 

 

"पंचायत समितीने महिला बचतगटांना मास्क तयार करण्याचे काम दिले आहे. त्यातून महिला रोजगारांची संधी उपलब्ध दिले आहे. पंचायत समितीने कापड व लेन्स दिले आहेत. मास्कला मोठी मागणी आहे. आतापर्यंत महिलांनी अडीच हजार मास्काची विक्री केली आहे. " 

भारती कांबळे, 
प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला बचतगट, कुर्ली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT