arbhak mrutyu 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक..राज्यात एक लाख बाल, अर्भक, उपजत अन्‌ माता मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : केरळ, कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रात अर्भक मृत्यूचा दर सर्वाधिक आहे. राज्यात एप्रिल 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत तब्बल 11 हजार 70 अर्भक मृत्यू तर सुमारे 10 हजार बालमृत्यू व उपजत मृत्यू आणि एक हजार 800 माता मृत्यू झाले आहेत. राज्यातील अर्भक, बाल व उपजत मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रजनन व बाल आरोग्य मोहिमेअंतर्गत दरवर्षी सुमारे दोन हजार 700 कोटींचा निधी देऊनही राज्यातील मृत्यूचे प्रमाण चार वर्षांपासून जैसे थेच आहे. 


अर्भक मृत्यूचे प्रमाण आदिवासी भागात सर्वाधिक असल्याची नोंद कुटुंब कल्याण कार्यालयाकडे असून राज्यात दरवर्षी बालमृत्यू, माता मृत्यू, अर्भक मृत्यू व उपजत मृत्यूचे सरासरी प्रमाण 22 ते 28 हजारांपर्यंत आहे. गर्भवती मातांना पोषक आहार मिळावा, मुलांचे कुपोषण थांबावे, त्यांची निरोगी वाढ व्हावी, मातांची प्रसुती उत्तम राहावी, त्यांना आहार अन्‌ संगोपनाची माहिती व्हावी, या हेतूने केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळतो. मात्र, उपाययोजनांच्या तुलनेत योजनांच्या प्रचार, प्रसिध्दीवरच अधिक खर्च केला जात असून उपाययोजना कागदावरच राहतात अशी चर्चा आहे. 2016-17 मध्ये राज्यात दोन हजार 760 बालमृत्यू तर एक हजार 229 माता मृत्यू, 17 हजार 197 अर्भक मृत्यू आणि नऊ हजार 112 उपजत मृत्यू झाले. 2017-18 मध्ये त्याचे प्रमाण 21 हजारांपर्यंत खाली आले मात्र, 2018-19 मध्ये पुन्हा 29 हजार 35 मृत्यू झाले. आता 2019-20 मध्येदेखील तीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. 

अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस कार्यक्रम
एप्रिल ते डिसेंबर 2019 या कालावधीत राज्यात सुमारे 11 हजार अर्भक मृत्यू झाले आहेत. आदिवासी भागात त्याचे प्रमाण सर्वाधिक असून केंद्र सरकारकडून प्रजनन व बाल आरोग्य मोहिमेअंतर्गत अर्भक मृत्यू कमी करण्यासह अन्य बाबींसाठी दरवर्षी सुमारे 700 कोटींचा निधी मिळतो. अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 
- डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य सेवा, पुणे 


राज्यातील स्थिती 
दरवर्षीचे अर्भक मृत्यू 
16,400 
प्रजनन व बाल आरोग्यासाठी निधी 
730 कोटी 
दर हजारांमागील अर्भक मृत्यू 
17 
अर्भक, बाल, उपजत मृत्यू 
21,070 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT