one person attack on other person the reason of love case in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

प्रेम प्रकरणातून केला गोळीबार ; प्रियकर गेला थेट जेलमध्ये

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : यमकनमर्डी येथे 16 डिसेंबरला भरमा भुपाळ धुपदाळ (रा. हत्तरगी) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी शुक्रवार (ता.1) एकाला अटक करण्यात आली आहे. प्रेमप्रकरणात अडथळा ठरल्याने त्यांच्यावर विनायक सोमशेखर होरगेरे (वय 26, रा. गणपत गल्ली यमकनमर्डी) याने गोळीबार केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून संशयिताला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. 

16 डिसेंबरला भरमा हे आपल्या मित्रासोबत यमकनमर्डी येथे कट्ट्यावर चर्चा करत बसले होते. त्यावेळी तोंडावर मंकी कॅप घालून आलेल्या एका अनोळखीने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडून पलायन केले होते. या प्रकरणी यमकनमर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संशयिताच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. वरील संशयिताला आज ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने भरमा यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. विनायक हा एका तरुणीवर प्रेम करत होता.

संबधीत तरुणीचे भरमा यांचे नातेवाईक लागतात. त्यामुळे त्यांनी विनायकच्या प्रियसीचा दुसरीकडे साखरपुडा केला. त्यामुळे त्याच्या मनात भरमा यांच्याबद्दल खुन्नस निर्माण झाली होती. प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या भरमा यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने विनायकने भरमा यांच्यावर गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT