पश्चिम महाराष्ट्र

ओएलएक्‍सवर बाईकची जाहिरात! वाचा कसा फसला तरुण..

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ओएलएक्‍स ऍपवर सेंकड हॅण्ड गाडी विकण्याचे अमिष दाखवून सोलापुरातील तरुणाची ऑनलाइन माध्यमातून 43 हजार 48 रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जितेंद्रसिंह नावाच्या व्यक्तीवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवड्यात अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक केल्याची ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. 

विविध कारणे सांगून घेतले पैसे
क्षितिज राजू बेरे (वय 24, रा. नवोदितनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्षितिज बेरे यांनी ओएलएक्‍सवर दुचाकी विकण्याची जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीच्या लिंकवर क्‍लीक केल्यानंतर त्यांना अधिक माहिती मिळाली. दुचाकीचा व्यवहार हा 35 हजार रुपयांत ठरवण्यात आला. त्यानंतर जितेंद्रसिंह याने गाडी नावावर करण्यासाठी, इन्शुरन्स अशी विविध कारणे सांगून वेळोवळी क्षितिज यांच्याकडून पैसे ऑनलाइन पद्धतीने घेतले.

हेही वाचा : फेसबुकवरून बुलेट खरेदी पडली महागात

जकात नाक्‍यावर गाडी अडवण्यात आली
लातूर बोरफळ येथे जकात नाक्‍यावर गाडी अडवण्यात आली असून आणखी पाच हजार रुपये मागितले. त्यानंतर फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षितिज बेरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. सेंकड हॅण्ड गाडी विकण्याचे अमिष दाखवून जितेंद्रसिंह याने ऑनलाइन पद्धतीने 43 हजार 48 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दुय्यम पोलिस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारताचं महत्त्व नेपाळला उमगलं! तणावानंतर आता मैत्रीचा हात; बालेन शाहांनी वाढवला राजनैतिक संवाद

Google मध्ये पुन्हा मोठी कपात! अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; टेक इंडस्ट्रीत अस्थिरता कायम

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध कशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? कधी आणि कुठे होणार सामना, जाणून घ्या

Palghar News: पालघरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू

'लग्नानंतर होईलच प्रेम'ची पार्टी अन् 'झिंगाट'वर थिरकली मृणाल दुसानिस; जबरदस्त डान्स पाहून चाहते म्हणाले- अरे ही तर...

SCROLL FOR NEXT