पश्चिम महाराष्ट्र

आयटीआयकडून प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन धडे 

सकाळवृत्तसेवा

सांगली  : कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या आयटीआयच्या परीक्षा या जुलै महिन्यात होत असतात. त्यामुळे त्या पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र परीक्षेपेक्षाही आमच्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण हा वर्क फ्रॉम होम चा पर्याय निवडला असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य श्री. यतिन पारगांवकर यांनी दिली. 


जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण देणारा कौशल्य विकास विभाग याबाबतीत दुसरा पर्यायी मार्ग निवडताना दिसत आहे.

याबाबत प्राचार्य श्री. यतिन पारगांवकर म्हणाले,""संस्थेतील सर्व निदेशक व्हॉटस्‌ऍप ग्रुप्स च्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद ठेवत आहेत. विविध चाचणी परीक्षा, यूट्यूब, भारत स्किल्स ऍप, याद्वारे हा उपक्रम अविरतपणे राबविला जात आहे. सोबतच घरी बसून सोडविण्यासाठी प्रश्नपत्रिका संच देखील दिले गेले आहेत. क्‍लासमार्कर्स, टेस्ट मॉझ सारख्या अद्ययावत वेबसाइट्‌सचा वापर करून मुलांच्याकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. प्रचलित खडू आणि फळा याऐवजी यूट्यूब आणि गुगल वरील ज्ञानाचा खजिना मुलांच्यासमोर ठेवला जात आहे. या पद्धतीस मुलांचा देखील उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

आयटीआय सांगलीमध्ये संपूर्ण राज्यातून सुमारे 1761 प्रशिक्षणार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेत असतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्या झाल्या लगेचच ऑटोमोबाईल, प्रॉडक्‍शन्स, सर्व्हिस, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फॅब्रिकेशन, कन्स्ट्रक्‍शन आणि संगणक क्षेत्रातील नामांकित आस्थापनांमध्ये ही मुले अप्रेंटीस म्हणून रुजू होतात. प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची गरज पाहता राज्यभरातून विविध कंपन्या आयटीआय सांगली येथे मार्च आणि एप्रिल महिन्यांत कॅंपस इंटरव्ह्यूसाठी येत असतात. मुलांचे पुढील नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्याशी देखील आम्ही संपर्कात आहोत.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT