blood.jpg
blood.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे...जिल्ह्यात केवळ आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा 

विष्णू मोहिते

सांगली- जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये केवळ 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील गरजू रूग्णांना सुरळीत व वेळेवर रक्त मिळण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे. गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यात दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. दरवर्षी जून ते ऑक्‍टोबर या काळात कॉलेजेस्‌ व कंपन्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे होतात. परंतु यंदा कोरोना प्रार्दुभावामुळे कॉलेजेस्‌ बंद आहेत व कंपन्या सुरू असून रक्तदान शिबीरे घेण्याची अनुकूलता नाही. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने विविध सामाजिक संस्थाकडून होणारे उपक्रम होऊ शकले नाहीत. याचा रक्त संकलनावर परिणाम झाल्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रक्तदानासाठी सद्या कोणी पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. 

थॅलेसिमिया, हिमोफिलीया, निमिया रूग्णांबरोबरच गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया, गरोदरमाता प्रसुती शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रूग्ण यांना रक्ताची गरज भासत आहे. अपेक्षित रक्त संकलन होत नसल्याने मागणी व पुरवठा यातील समतोल बिघडू लागला आहे. या करीता जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. सध्या जिल्ह्यातील 2 शासकीय व 16 खासगी अशा एकूण 18 रक्तपेढ्या आहेत. रक्तपेढ्यांकडे 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असून गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करावे. शासकीय रक्तपेढ्यांत गरजू रूग्णांकरीता रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT