well.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पाणीटंचाईत नागरिकांसाठी स्वत:ची विहिर केली खुली

सकाळवृत्तसेवा

कवठेमहांकाळ (सांगली)-  येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात शहरातील नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. नागरिकांची ही तगमग ओळखून येथील भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी सुमित कुलकर्णी यांनी स्वत:च्या विहिरीतील पाणी वापरण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाकडे दिले आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात सुसह्य झाली आहे. सुमारे 30 हजार नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. कुलकर्णी कुटुंबियांच्या या दातृत्वाचे नगरपंचायतीने कौतुक केले आहे. 

शहराला लांडगेवाडी तलाव, हिंगणगाव रोडवरील विहिरीसह काळे प्लॉटवरुन पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे. मात्र लांडगेवाडी तलावाचे खोलीकरण व विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरु असल्याने शहराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या. त्याचप्रमाणे म्हैसाळ योजनाही सध्या बंद असल्याने पाणीटंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. 

शहराचा वाढता विस्तार पाहता रोज मिळणारे पाणी पुरत नसल्याचेही नागरिक सांगतात. ही अडचण ओळखून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी शहरानजीक शेत असणाऱ्या सुरेश कुलकर्णी यांना विहिरीचे पाणी देण्याची विनंती केली. श्री. कुलकर्णी यांनी ती तात्काळ मान्य करत माणुसकी धर्म जागता ठेवला. यापूर्वीही भीषण दुष्काळी परिस्थितीत श्री. कुलकर्णी यांनी रोज 6 लाख लीटर पाणी विनामोबदला देत नागरिकांची तहान भागवली होती. नगराध्यक्ष पंडित दळवी, नगरसेवक सुनील माळी, चंद्रशेखर सगरे यांनी कुलकर्णी यांचे या अमूल्य मदतीबद्दल आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT