logo 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर झेडपीत पेच विरोधी पक्षनेते अन्‌ पक्षनेते पदाचा 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? याबाबतची उत्सुकता आता निर्माण होऊ लागली आहे. 68 पैकी सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्‍यता आहे. 14 सदस्य असलेल्या भाजपचा पक्षनेता होईल, अशीही शक्‍यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिकारात असलेल्या या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातून मुस्लिम टार्गेट 
जिल्हा परिषदेत सत्तेचे अजब रसायन जन्माला आले आहे. सदस्य संख्येने मोठे असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपचा एकही पदाधिकारी नाही. पाच सदस्य असलेल्या शिवसेनेचा अध्यक्ष तर तीन सदस्य असलेल्या समाधान आवताडे गटाचा उपाध्यक्ष झाला आहे. विषय समिती सभापती निवडीत सात सदस्य असलेल्या कॉंग्रेसला समिती मिळाली. गणपतराव देशमुख व दीपक साळुंखे-पाटील यांच्या आघाडीला दोन समित्या मिळाल्या. तीन सदस्य असलेल्या डोंगरे गटालाही एक समिती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात ज्यांची शक्ती लहान परंतु निर्णायक आहे त्यांनाच पदे मिळाली आहेत. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळाल्यास माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले आहे. हा तांत्रिक मुद्दा समोर येण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपदी भाजपच्या सदस्याची वर्णी लागते की सांगोल्यातील शिवसेना आमदार शहाजी पाटील गटाच्या सदस्याची किंवा सभापती विजयराज डोंगरे यांच्या सदस्याला संधी मिळते या बद्दल देखील कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT