mnp 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत प्रतापसिंह उद्यानातील जागा भाड्याने देण्यास विरोध , भाजपचा पवित्रा : बळावर मंजूर केल्यास रस्त्यावर उतरु 

Balraj Pawar

सांगली : प्रतापसिंह उद्यानातील जुनी इमारत भाड्याने देण्यासाठी महापालिका प्रशासनाने आज ई लिलाव घेतले. मात्र या प्रकाराला भाजपचा पुर्ण विरोध आहे. लिलाव झाला तरी अंतिम निर्णय महासभा घेणार आहे. तेथे तो रद्द करण्यात येईल. ताकदीच्या बळावर विरोधकांनी हा लिलाव मंजूर केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करु असा आज भाजपने इशारा दिला. 


भाजपचे गटनेते युवराज बावडेकर, ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे आणि नगरसेवक गजानन मगदूम यांनी पत्रकार बैठकीत जागांच्या लिलावाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मुन्ना कुरणे म्हणाले, महापालिकेत पुन्हा एकदा नाव बदलून जागा हडप करण्याचा उद्योग सुरु आहे. मागच्या सत्ताधाऱ्यांनी बीओटीच्या नावावर महापालिका मुख्यालयाशेजारच्या प्रतापसिंह उद्यानापासून तमाशा थिएटर बीओटी करण्याचा विषय आणला होता. त्याला विरोध करुन तो हाणून पाडला. आता आर्थिक उत्पन्न वाढीच्या नावाखाली उद्यानाची जागा हडपण्याचा प्रकार सुरु आहे. त्याला विरोध करणार. नवीन सदस्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. कोणत्याही स्थितीत उद्यान दिले जाणार नाही. 


ते म्हणाले, कुठल्या तरी नगरसेवकाने सुपारी घेतली असावी असा संशय आहे. आधी हॉटेलच्या माध्यमातून जागा घ्यायची आणि नंतर जागा हडप करायची असा पडद्या मागचा उद्योग सुरु आहे त्याला आम्ही ताकदीने विरोध करु. पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी विकाविकी केली होती, तसे भाजप करणार नाही. 


श्री. बावडेकर म्हणाले, महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता भाजपने उत्पन्न वाढीचे स्त्रोत वाढवण्यासाठी दर सुधार समिती स्थापन केली होती आणि महासभेत ठराव करुन दुकान गाळे, खुल्या जागा व अन्य मालमत्तांच्या माध्यमातून किचकट असलेली लिलाव प्रक्रिया सोपी व जलदगतीने होण्यासाठी प्राथमिक प्रक्रिया राबवण्यासाठी आयुक्तांना प्राधिकृत करुन अधिकार दिले होते. त्यानंतर अंतिम निर्णय महासभा घेईल असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. आज या जागेचा लिलाव झाला तरी भाजपला हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी महासभेकडे हा विषय आल्यानंतर तो रद्द करु. 


श्री. मगदूम म्हणाले, जागेचा लिलाव झाला तरी एक इंचही जागा हॉटेल अथवा शॉपिंग सेंटरसाठी दिली जाणार नाही. ताकदीच्या बळावर विरोधकांनी हा विषय मंजूर केल्यास भाजप रस्त्यावर उतरुन विरोध करेल. बेकायदेशीर ठरावाला भाजप पाठिंबा देणार नाही.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT