Original owner in court for hospital space in Varanasi 
पश्चिम महाराष्ट्र

वारणालीतील हॉस्पिटलच्या जागेसाठी मूळ मालक न्यायालयात

बलराज पवार

सांगली : महापालिकेच्या वारणालीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित जागेचे खरेदीपत्रच झालेले नसल्यामुळे मूळ मालकाने आरक्षण रद्द करून जागा परत मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे महापालिकेने कायदेशीर पूर्तता करून जागेचा वाद मिटवावा, अशी मागणी जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे यांनी केली आहे. 

ऍड. शिंदे म्हणाले,""राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कुपवाडला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय झाला होता. मात्र कुपवाड शहरात हॉस्पिटल न करता त्याऐवजी वारणालीत हॉस्पिटलसाठी जागा निश्‍चित केली. परंतु त्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. या जागेवर हॉस्पिटलसाठीचे आरक्षण आहे. ते उठविण्यासाठी जागेच्या मूळ मालकाने 2006 मध्ये वटमुखत्यार पत्र केले होते. यामध्ये वटमुखत्यार नेमलेल्या व्यक्तीस केवळ आरक्षण उठवण्याचे काम सोपवले होते. 

आरक्षण न उठल्यास मोबदला देण्याचा देण्याचे नमूद केले होते; मात्र जागा खरेदीचा विषय कोठेही नाही. शिवाय वटमुखत्यार नेमलेल्या व्यक्तीने विक्रीचा अधिकार नसताना ही जागा विकली आहे. या जागेवर हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर मूळ मालकाने सप्टेंबर 2019 मध्ये न्यायालयात दावा दाखल केला आहे. तेरा वर्षांनंतर मूळ मालक कसा जागा झाला त्यांना कुणी उठवून बसवले असे प्रश्‍न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. यामध्ये राजकारण असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. 

ते म्हणाले,""शासन नियमानुसार पन्नास हजार लोकसंख्येमागे एक नागरी आरोग्य केंद्र तर अडीच लाख लोकसंख्येमागे एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असणे आवश्‍यक आहे. त्यानुसार महापालिकेच्या लोकसंख्येनुसार तीन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होणे आवश्‍यकता आहे. त्यापैकी एक मंजूर झाले आहे. उर्वरित दोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांकडे केली आहे.''

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT