NIPANI SAKAL
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : बसस्थानकात प्रवेश नसल्याने इतर आगाराच्या बसेस निपाणीत राहिल्या थांबून

प्रवाशांची गैरसोय कायम ; कर्नाटक बसला आरटी-पीसीआरची चाचणीचा फटका

विकास पाटील

निपाणी : कर्नाटक-महाराष्ट्र महामंडळाच्या अनेक बैठका होऊनही आंतरराज्य बससेवेबाबत ठोस निर्णय न झाल्याने शासनाच्या नियमानुसार दोन्ही राज्यातील बससेवेस बुधवार (ता. 29) पासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र बसेस निपाणी बसस्थानकात न येता त्या महामार्गावरून थेट जात आहेत. तर कर्नाटक बससेना कोल्हापूर बसस्थानकात प्रवेश नसल्याने त्या तावडे हाॅटेलपासून सरळ मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाला आंतरराज्य बससेवेबाबत हिरवा कंदील मिळाला असला तरी त्यांना आरटी-पीसीआर सक्तीचा केला आहे. निपाणी आगारातून कोल्हापूर (तावडे हाॅटेल), औरंगाबाद, चिपळूण, नाशिक, पुणे, मुंबई या मार्गावर बससेवा सुरु केली आहे. या मार्गावर निपाणीतून 12 बसेस धावत असून 28 चालक-वाहक सेवा बजावत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह कामगारातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारयांनी कोगनोळी टोलनाका ते तवंदी घाट या मार्गावर महाराष्ट्र बसमधील प्रवासी उतरण्यास व घेण्यास मनाई केली आहे. या टापूत महाराष्ट्र बसमध्ये प्रवाशांना प्रवेशही दिला जात नाही व उतरलेही जात नाही. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांची कोंडी होत आहे. कोल्हापूर विभागाच्या आजरा, चंदगड, गडहिंग्लज, नेसरी, कोवाड, सावंतवाडी, पणजी या मार्गावर बसेस सुरु आहेत.

`कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हाधिकारयांनी कर्नाटकात बस सुरु करण्याबाबत अद्याप आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे कर्नाटक हद्दीत प्रवाशांची चढ-उतार नसल्याने चंदगड, आजरा, गडहिंग्लज, उतूर, नेसरी, सावंतवाडी या मार्गावरी बसेस महामार्गावरून जात आहेत.`

-एस. बी. जाधव,

विभागीय नियंत्रणाधिकारी, कोल्हापूर

`कोल्हापूर बसस्थानक वगळता चिपळूण, बारामती, नाशिक, पुणे, मुंबई औरंगाबाद या भागात बससेवा सुरु केली आहे. त्याचा प्रवाशांना चांगला लाभ होत आहे. मात्र आरटी-पीसीआर सक्तीचे केले आहे.`

-मंजुनाथ हडपद,

आगार व्यवस्थापक, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT