पश्चिम महाराष्ट्र

...अन्यथा अण्णा हजारेंसाठी राळेगणसिद्धी परिवार करणार आत्मदहन

मार्तंड बुचुडे

पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते.

विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन दिवस वाट पाहू, अन्यथा मंगळवारी संपूर्ण राळेगणसिद्धी परिवार आत्मदहन करणार आहे, असा इशारा उपसरपंच लाभेष औटी यांनी दिला.

सुरेश पठारे म्हणाले, उद्यापासून गनिमी काव्याने लढा देऊ हजारे यांचे काही बरे वाईट झाले तर जबाबदारी सरकारची आहे. या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. निर्णय लवकर झाला नाही तर सरकारच्या कोणत्याही पुढाऱ्यांना फिरकू देणार नाही. शंकर नगरे यांनी सरकार दखल घेत नाही, त्याबाबत सरकारचा व तालुका जिल्हा लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला.

राहुल शिंदे म्हणाले, उद्या यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेष औटी, जयसिंग मापारी, राहुल खामकर, दत्त आवारी, दादा पठारे उपस्थित होते. 

'माझे गाव, माझे सरकार' या नियमाप्रमाणे आम्ही मंगळवारपासून कोणत्याही अधिकारी व पुढाऱ्यांना गावात येऊ देणार नाहीत'', असे लाभेष औटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT