village.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गड्या आपला गावं बरा...

दिग्विजय साळुंखे

बोरगाव-जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील, खेडेगावातील तरुणाई नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे शहरात स्थिरावली आहे. मात्र या शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागल्याने तरुणाई धास्तावली आहे. 


ग्रामीण भागातील किंवा गावातील एखादा मुलगा, मुलगी एखादं कुटुंब पुणे,मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात नोकरी उद्योगासाठी असतील आणि ते गावाकडे परतले की त्यांचा वेगळाच थाट वेगळाच बाज असतो. सणासुदीला किंवा घरच्या कार्यक्रमाला त्यांचे येणे होते. मात्र सध्या "कोरोना' मुळे त्यांना "गड्या आपला गाव बरा'... असं म्हणण्याची वेळ आली आहे.

बाहेरगावी व मोठ्या शहरात असलेले युवक, गलाई बांधव,व्यवसाईक गावोगावी दिसू लागले आहेत. 
ग्रामीण भागातील अनेक तरुण कामानिमित्त, नोकरी निमित्ताने पुणे,मुंबई या राज्यातील मोठ्या शहरासह तसेच राज्याबाहेरील बंगरुळ, हैद्राबाद, गुजरात, दिल्ली तसेच देशाबाहेर गेले आहेत. प्रत्येक गावातील पाच-पन्नास मुले पुणे, मुंबई शहरात दिसत आहेत.

"कोरोना' मुळे शहर वासीयांना आपली गावे सुरक्षित वाटू लागली आहेत. मुंबई, पुणे आणि देशातल्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने गावातले नातेवाईक, आई-वडील, भाऊ यांनी आपल्या शहरवासीयांना गावाकडे येण्याचा सल्ला दिला आहे. 
सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून गावाकडे परतू लागले आहेत.

"गड्या आपला गावच बरा'असे या कोरोनाच्या निमित्ताने का असेना आता त्यांना वाटू लागले आहे. 
ग्रामीण भागात तरुण वर्ग,गलाई बांधव,कुटुंबे गावाकडे येऊ लागली आहेत. मात्र त्यांच्या तपासणीच्या आणि सुरक्षित बाबत अगदी कमी प्रमाणात तपासणीचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या शहरवासीयांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देऊन आरोग्य विभागाकडून तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

SCROLL FOR NEXT