out of school student survey form belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण लवकरच 

मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षणापासुन दुर गेलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे लवकरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच सर्व्हेक्षणाचे काम, करण्याच्या कामासाठी ग्राम पंचायतीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. 


1 ते 16 वयोगटातील विद्यार्थी घरच्या परिस्थितीसह विविध कारणांनी शाळा सोडुन देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. यापैकी अनेक विद्यार्थ्याना शिक्षण घ्यायचे असते. त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासुन शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करीत असतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात येते मात्र यावेळी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सर्व्हेक्षणास विलंब झाला आहे. मात्र लवकरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्याचे काम हाती सुरु केले जाणार असुन पालकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे. 


बेळगाव शैक्षणिक जिल्हात दरवर्षी 400 ते 500 शाळाबाह्य विद्यार्थी आढळुन येतात मात्र यावेळी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 1 ते 16 वयोगटातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासुन दुर राहु नये यासाठी शिक्षण खात्याकडुन विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासह गणवेश, पाठ्‌यपुस्तके, माध्यान्ह आहार, दुध आदींचे वाटप केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्तीही दिली जाते. तरीही विद्यार्थी शाळा सोडुन इतर कामांकडे वळतात. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी सर्व्हेक्षण करावे लागत आहे. 


सर्व्हेक्षण योग्य प्रकारे व्हावे यासाठी शाळा सुधारणा कमिटी, ग्रामस्थ, जिल्हा पंचायत, महिला व बाल कल्याण खाते, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच सर्व्हेक्षणानंतर एसएटीएस सॉफ्टवेअरध्ये शिक्षकांना माहिती अपलोड करावी लागणार आहे. 

दरवर्षी प्रमाणे यावेळीही शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण होणार आहे. मात्र सर्व्हेक्षण कधी पासुन सुरु करावे याबाबतची तारीख लवरकच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण झाल्यानंतर माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणले जाणार आहे. 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

SCROLL FOR NEXT