The overwhelming response to "Bagful of Love" on digital platforms 
पश्चिम महाराष्ट्र

"बॅगफुल ऑफ लव्ह'ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर उदंड प्रतिसाद

जयसिंग कुंभार

सांगली : मध्यमवयीन सख्ख्या शेजाऱ्यांचं सततच भांडण आणि शेवटी त्याचं प्रेमात पडणं.. एका दहा मिनिटांचा लघुपटात मांडला आहे. "बॅगफुल ऑफ लव्ह' या लघुपटाला हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उदंड प्रतिसाद मिळत आहे. सांगलीतील चिन्मयी भोकरे हिने तो दिग्दर्शित केला आहे. ममता वर्मा आणि गिरीष सहदेव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. 

वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे लघुपटांना गेल्या काही वर्षात उदंड प्रतिसाद मिळत आहे. नवनव्या कलावंतासाठी ती सुसंधी ठरतेय. सध्याच्या टाळेबंदीत तर हेच चित्रपट प्रदर्शनाचं माध्यम ठरतंय. "हॉटस्टार'ने या लघुपटाची निवड केल्याने चिन्मयीच्या पाठीवर कौतुकाची थापच पडली आहे. 


चिन्मयीने यापुर्वी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वुडस्‌ या दिग्दर्शनाची पदविका घेतली आहे. हा लघुपट तिच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. ये दिल है मुश्‍किल... कलंक आणि उरी या चित्रपटांसाठी तीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शनसोबत तीने काही काळ उमेदवारी केली आहे. आता स्वतः चित्रपट निर्मितीच्या तयारीत आहे. या लघुपटासाठी विद्यासागर, तारिक महंमद, सलोनी धात्रक यांचे सहकार्य मिळाले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT